Anjali Tendulkar : अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्यानंतर आई अंजलीचा मोठा निर्णय
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो आणि त्याचं संपूर्ण कुटुंबच चर्चेच्या केंद्रस्थानी आलं होतं. त्यामागचं कारण म्हणजे सचिनचा लाडका लेक, अर्जुन तेंडुलकर याचा झालेला साखरपुडा. या दोघांबद्दलच्या बातम्या, फोटो सातत्याने व्हायरल होत आहेत. मात्र या बातमीला अवघा एक आठवडा उलटत नाही तोच अंजली तेंडुलकर हीदेखील चर्चेत आली आहे. कारण..

क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला, फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात लोकप्रिय असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो आणि त्याचं संपूर्ण कुटुंबच चर्चेच्या केंद्रस्थानी आलं होतं. त्यामागचं कारण म्हणजे सचिनचा लाडका लेक, अर्जुन तेंडुलकर याचा झालेला साखरपुडा. रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात अर्जुन तेंडुलकर आणि प्रसिद्ध उद्योगपती रवि घई यांची नात सानिया चंडोक यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर या दोघांबद्दलच्या बातम्या, फोटो सातत्याने व्हायरल होत आहेत. मात्र या बातमीला अवघा एक आठवडा उलटत नाही तोच अंजली तेंडुलकर हीदेखील चर्चेत आली आहे. कारण लाडक्या लेकाच्या, अर्जुनच्या साखरपुड्यानंतर अंजली तेंडुलकरने एक मोठा निर्णय घेतला आहे.
अंजली तेंडुलकरची मोठी खरेदी
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर हिने एक मोठी खरेदी केली आहे. Zapkey.com ने मिळवलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, अंजली हिने मुंबईजवळील विरारमध्ये 32 लाख रुपये किमतीची एक अपार्टमेंट (फ्लॅट) खरेदी केली आहे. विरारमधील पेनिन्सुला हाइट्स नावाच्या इमारतीत हे अपार्टमेंट खरेदी करण्यात आल्याची माहिती कागदपत्रांवरून मिळत आहे. 391 चौरस फूट आकाराचे हे अपार्टमेंट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असल्याचे समजते.
कागदपत्रांनुसार, अपार्टमेंट खरेडीचा हा व्यवहार 30 में 2025 रोजी नोंदणीकृत (रजिस्टर्ड) झाला होता आणि त्यात 1.92 लाखांची स्टँम्प ड्युटी आणि 30 हजार रुपये रजिस्ट्रेशन फी भरण्यात आली.
महिला घर खरेदीदार म्हणून, अंजली तेंडुलकर यांनी स्टॅम्प ड्युटीवर 1% सवलतीचा लाभ घेतला. महाराष्ट्रात, महिला घरमालकांना या लाभाचा लाभ मिळतो, राज्यात शहर आणि जिल्ह्यानुसार स्टॅम्प ड्युटी दर 5% ते 7% दरम्यान असतात.
स्थानिक ब्रोकर्सच्या मते, विरारमधील निवासी मालमत्तेचा दर प्रति चौरस फूट 6, 000 रुपये ते 9,000 रुपये प्रति चौरस फूट आणि त्याहून अधिक आहे, जो लोकेशनवर अवलंबून आहे. विरार हा मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) एक भाग आहे आणि मुंबईच्या मध्यभागी आणखी उत्तरेस आहे.
दरम्यान या वर्षीच्या सुरूवातीस बॉलिवूड अभिनेता , किंग खान शाहरूख याची पत्नी आणि प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर गौरी खान हिने यांनी मुंबईतील खार पश्चिम येथे त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी 725 चौरस फूट आकाराचे, 2 बीएचके अपार्टमेंट भाड्याने घेतले होते, ज्याचे सुरुवातीचे मासिक भाडे 1.35 लाख रुपये इतके होते, अशी माहिती समोर आली होती.
पाली हिलमधील त्यांच्या भाड्याच्या घरापासून फक्त 100 मीटर अंतरावर असलेल्या फ्लॅटसाठी तीन वर्षांचा लिव्ह अँड लायसन्स करार करण्यात आला होता, तर त्यांच्या प्रसिद्ध अशा मन्नत बंगल्यामध्ये रिनोव्हेशनचे काम सुरू आहे.
