
माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणार आहे. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणार आहे. आता प्रश्न असा आहे की ती मोहीम कशाबद्दल आहे? आणि, सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियाला कशी मदत करेल ? हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे, सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणार आहे. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
अनेक देशात सुरू होणार ऑस्ट्रेलियाचं कँपेन
जगातील अनेक देशांमध्ये ऑस्ट्रेलियाची नवीन पर्यटन मोहीम अर्थात टूरिजम कँपेन सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलिया प्रत्येक देशातून एक चेहरा या पर्यटन मोहिमेचा चेहरा बनवत आहे, जेणेकरून त्या देशांतील लोक ऑस्ट्रेलियाला भेट देण्यासाठी येतील. जर असे झाले तर ऑस्ट्रेलियाचे पर्यटनातून मिळणारे उत्पन्नही वाढेल.
या देशांचं नाव आघाडीवर, सारावर भारताची जबाबदारी ?
भारताव्यतिरिक्त, युनायटेड किंग्डम, चीन, जपान, अमेरिका यासारख्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया आपली पर्यटन मोहीम सुरू करणार आहे. त्यांनी त्या प्रत्येक देशातून एका सेलिब्रिटीला त्याचा भाग बनवले आहे. सारा तेंडुलकर हिला भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अमेरिकेत, स्टीव्ह इर्विन यांचा मुलगा रॉबर्ट इर्विन ऑस्ट्रेलियाच्या मोहिमेचा चेहरा बनला आहे. युनायटेड किंग्डममध्ये, शेफ निगेला लॉसन यांना ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन मोहिमेला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
साराची ऑस्ट्रेलिया भ्रमंती
सारा तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाबद्दल विशेष आकर्षण आहे, असं दिसतं. तिने त्या देशाला अनेक वेळा भेट दिली आहे आणि तो देश एक्सप्लोर केला आहे. तिने ऑस्ट्रेलियातील जवळजवळ प्रत्येक पर्यटन स्थळाला भेट दिली आहे आणि त्याचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते.
पण, आता सारा तेंडुलकरसाठी, प्रवास करण्याची वेळ नाही तर इतरांना प्रवास करायला लावण्याची वेळ आहे. ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाबद्दल लोकांना सांगण्याची वेळ आली आहे. त्याचा प्रचार करण्याची वेळ आली आहे. सारा तेंडुलकरचे असे प्रयत्न ऑस्ट्रेलियाच्या मोहिमेला खूप मदत करतील. त्यांचे (ऑस्ट्रेलिया) पर्यटन वाढेल आणि त्यासोबतच त्यातून मिळणारे उत्पन्नही वाढेल.