बुमराहच्या कौतुकासाठी सेहवागची आठवले स्टाईल कविता

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने वर्चस्व मिळवलं आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 151 धावात गुंडाळला. त्यामुळे भारताला 292 धावांची मोठी आघाडी मिळाली. कांगारुंची फलंदाजी कापून काढण्यात मोठा वाटा उचलला तो म्हणजे जसप्रीत बुमराहने. एकट्या बुमराने ऑस्ट्रेलियाच्या तब्बल 6 विकेट्स काढल्या. बुमराहच्या तोफगोळ्यांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना उभंही राहता येत नव्हतं. येईल […]

बुमराहच्या कौतुकासाठी सेहवागची आठवले स्टाईल कविता
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने वर्चस्व मिळवलं आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 151 धावात गुंडाळला. त्यामुळे भारताला 292 धावांची मोठी आघाडी मिळाली. कांगारुंची फलंदाजी कापून काढण्यात मोठा वाटा उचलला तो म्हणजे जसप्रीत बुमराहने. एकट्या बुमराने ऑस्ट्रेलियाच्या तब्बल 6 विकेट्स काढल्या. बुमराहच्या तोफगोळ्यांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना उभंही राहता येत नव्हतं. येईल तो फलंदाज बुमराहची गोलंदाजी चकवू पाहात होता, मात्र बुमराहने एकेकाला ओळीने तंबूत धाडलं.

बुमराहच्या याच गोलंदाजीवर सोशल मीडियातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. नेहमीच हटके ट्विटसाठी प्रसिद्ध असलेल्या टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही बुमराचं त्याच्या शैलीत कौतुक केलं. सेहवागने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शैलीत कवितेची ओळ ट्विट केली.

‘ऑस्ट्रेलिया के लिए पेन, जसप्रीत बुमराह दिस इयर बिगेस्ट गेन’, अशी आठवले स्टाईल कविता सेहवागने केली. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचं नाव टीम पेन आहे. त्याचाच संदर्भ घेत सेहवागने कवितेतून कोटी करण्याचा प्रयत्न केला.

ट्विटमध्ये सेहवाग म्हणतो, “‘ऑस्ट्रेलिया के लिए पेन, जसप्रीत बुमराह दिस इयर बिगेस्ट गेन’. भारतीय संघाची जबरदस्त कामगिरी, ऑस्ट्रेलियाला 151 धावात गुंडाळलं. हवामान चांगलं राहावं हीच प्रार्थना. भारतीय संघाच्या दमदार खेळामुळे त्यांनी या कसोटीत विजय मिळवावा”

बुमराहची भेदक गोलंदाजी

तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत जसप्रीत बुमराहच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. एकट्या बुमराहने तब्बल 6 फलंदाजांना माघारी धाडत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 151 धावात गुंडाळला. त्यामुळे भारताला तब्बल 292 धावांची आघाडी मिळाली. बुमराने 15.5 षटकात अवघ्या 33 धावा देत तब्बल 6 विकेट्स घेतल्या. बुमराच्या तोफगोळ्यांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची अक्षरश: दाणादाण उडाली. एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने वर्चस्व मिळवलं आहे. या कसोटीत भारताने पहिल्या डावात 443 धावांवर पहिला डाव घोषित केला होता.

संबंधित बातमी 

IndvsAus: बुमराहचे तोफगोळे, ऑस्ट्रेलिया 151 धावांत कोलमडली 

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.