AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी बांगलादेशी, आणि आता पाकिस्तानी खेळाडूला टीममध्ये आणला, शाहरुख खान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

शाहरुख खान आता पुन्हा चर्चेत आला आहे. आयपीएलमध्ये शाहरुख खानने मुस्तफिजूर रहमानला आपल्या संघात सामील केले होते पण नंतर अनेक वादानंतर त्याला संघातून वगळण्यात आले, आता पाकिस्तानी खेळाडूला संघात सामील केल्यानंतर वाद रंगला आहे.

आधी बांगलादेशी, आणि आता पाकिस्तानी खेळाडूला टीममध्ये आणला, शाहरुख खान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
| Updated on: Jul 24, 2026 | 1:12 PM
Share

शाहरुख खानच्या संघ, कोलकाता नाईट रायडर्सने, आयपीएल 2026 साठीच्या लिलावात बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघात घेतले. त्यावेळी बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर केकेआरला टीकेला सामोरे जावे लागले आणि संघाने हंगाम सुरू होण्यापूर्वीच त्या बांगलादेशी खेळाडूला करारमुक्त केले. यामुळे शाहरुख खानला अनेक वादांना तोंड द्यावे लागले. आता, शाहरुख खानच्या संघ, नाईट रायडर्सने एका पाकिस्तानी खेळाडूला करारबद्ध केले आहे. यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. पुन्हा एकदा शाहरुख खानवर टीका होत आहे.

शाहरुख खानची फ्रँचायझी, ट्रिनबागो नाईट रायडर्स, कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये खेळते. या फ्रँचायझीने आगामी हंगाम 2026 साठी परदेशी खेळाडूंची यादी जाहीर केली, ज्यात पाकिस्तानी फिरकी गोलंदाज उस्मान तारिकच्या नावाचा समावेश होता, ज्यामुळे संतापाची लाट उसळली. सीपीएलने गुरुवारी म्हणजे 23 जुलै 2026 संघासाठी परदेशी खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत उस्मान तारिकचे नाव चाहत्यांने दिसले. गेल्या हंगामातही ट्रिनबागो नाईट रायडर्सकडून खेळला होता. तो त्या हंगामात दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. उस्मानने 10 सामन्यांमध्ये 13.95 च्या सरासरीने आणि 7.31 च्या इकॉनॉमी रेटने 20 बळी घेतले. तो संघाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. या पाकिस्तानी फिरकीपटूच्या गोलंदाजीने संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये उस्मानचा हा पहिलाच हंगाम होता.

या स्पर्धेचा आगामी हंगाम 7 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होत आहे. नाईट रायडर्स 8 जुलै रोजी या हंगामातील आपल्या मोहिमेला सुरुवात करतील. या हंगामात संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. उस्मान पाकिस्तानसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. तो 2026 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून खेळला होता. विश्वचषकाच्या पाच सामन्यांमध्ये त्याने 14.10 च्या सरासरीने 10 बळी घेतले. त्याने आतापर्यंत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत नऊ टी-20 सामने खेळले आहेत. आठ डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 11.16 च्या सरासरीने 18 बळी घेतले आणि 6.66 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.

Follow Us
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी...
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी कोर्टाची थेट कारवाई
84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
Nagpur MLC Election Result : नागपूर पदवीधर मतमोजणी सुरू; 84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणीवरून भाजप नेत्याचं मोठं विधान
MLC Election 2026 Result Updates : शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणी प्रक्रियेवरून भाजप नेत्याचं मोठं विधान, थेट म्हणाले...
प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या.
Amravati MLC Election 2026 Result: प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत काय घडतंय?
नागपूर पदवीधर निवडणुकीत 34 पोस्टल मतं बाद; निकालाच्या गणितावर काय....
Nagpur MLC Election 2026 Result : नागपूर पदवीधर निवडणुकीत 34 पोस्टल मतं बाद; निकालाच्या गणितावर काय परिणाम होणार?
एकूण सहा फेऱ्यांनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार
Maharashtra MLC Election 2026 Result : एकूण सहा फेऱ्यांनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार
शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात....
Shivsena : शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
प्रचंड लक्ष्मी दर्शन झालं, पण विजय सरस्वतीचाच; सतेज पाटलांचा....
Satej Patil : प्रचंड लक्ष्मी दर्शन झालं, पण विजय सरस्वतीचाच; सतेज पाटलांचा विरोधकांना टोला
झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक
Sanjay Raut : झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक
छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा...
Sanjay Raut : छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा सरकारवर घणाघात