AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: त्या दोघांमुळे आम्ही जिंकलो, पहिल्या विजयाचे क्रेडिट देताना श्रेयसकडून मोठी चूक, मॅचविनरचं नावही घेतले नाही

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पहिला टी-20 सामना रंगला. अखेर भारतीय संघाला टी-20 सामना जिंकण्यात यश आल्याने श्रेयस अय्यर फार खुश झाला. सामना जिंकल्यानंतर तो दोघांना क्रेडिट द्याला विसरला नाही.

IND vs ZIM: त्या दोघांमुळे आम्ही जिंकलो, पहिल्या विजयाचे क्रेडिट देताना श्रेयसकडून मोठी चूक, मॅचविनरचं नावही घेतले नाही
| Updated on: Jul 24, 2026 | 11:47 AM
Share

हरारे येथे झालेल्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेवर 7 गडी राखून दणदणीत विजय नोंदवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.  126 धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघाने केवळ 13.2 षटकांत सहज विजय मिळवला. अखेर श्रेयस अय्यरला आपल्या कर्णधारपदात पहिला सामना जिंकण्यात यश मिळाले. श्रेयस कर्णधार झाल्यानंतर त्याने एकूण सात टी-20 सामने खेळले आहेत. त्यात फक्त एक सामना त्याला कर्णधार म्हणून जिंकता आला. आता पहिला सामना जिंकल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर फारच खुश दिसला. त्याने सामना जिंकल्यानंतर एक विधान केले त्याची आता जोरदार चर्चा होत आहे. श्रेयसने ही सामना जिंकण्याचे क्रेडिट कोणाला दिले ते पाहा.

टी20 कर्णधार म्हणून आपला पहिला विजय नोंदवल्यानंतर श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले. श्रेयस अय्यर म्हणाला, “वैभव पूर्णपणे निर्भय आहे. ज्या पद्धतीने तो आपल्या डावाची सुरुवात करतो, ते पाहणे अप्रतिम असते. जेव्हा तो मैदानावर उतरतो, तेव्हा त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो. मयंकने आम्हाला एक उत्तम सुरुवात करून दिली. आम्हाला इथे अजून दोन सामने खेळायचे आहेत, त्यामुळे आजच्या कामगिरीने सर्वांचा आत्मविश्वास वाढवला आहे.”  हे हरारेचे मैदान वैभवसाठी खूप खास होते, जो सुरुवातीला इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरला होता. याच मैदानावर त्याने 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यात 80 चेंडूंमध्ये 175 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. झिम्बाब्वेविरुद्ध वैभवने चार चौकार आणि चार उत्तुंग षटकार मारून झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली. तो पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला.

हा सामना भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरसाठीही खूप संस्मरणीय होता. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांवर सलग पराभव पत्करल्यानंतर,  श्रेयस अय्यरने अखेर भारतीय टी20 कर्णधार म्हणून आपला पहिला विजय मिळवला. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या विजयानंतर अत्यंत आनंदित झालेल्या अय्यरने सांगितले, “आमच्या संघाची कामगिरी अपवादात्मक होती. खेळाडूंनी मैदानावर आपल्या रणनीतीची उत्कृष्टपणे अंमलबजावणी केली. आमचा पहिला विजय मिळवल्याचा मला खूप आनंद झाला आहे.”

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना अय्यरने गोलंदाजांचेही कौतुक केले. वेगवान गोलंदाज मयंक यादवने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर ब्रायन बेनेटला बाद करून भारताला स्वप्नवत सुरुवात करून दिली. मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेला 20 षटकांत 7 गडी गमावून 125 धावांवर रोखले. त्या दोघांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. यानंतर, वैभवची वादळी खेळी, इशान किशनच्या 35 धावा आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद 28 धावांच्या जोरावर भारताने सहजपणे लक्ष्य गाठले.

Follow Us
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार