शोएब अख्तर म्हणतो, 'पाकिस्तानसोबत न खेळण्याचा भारताला पूर्ण हक्क, पण...'

नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रभाव भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडूंवरही झाला आहे. या हल्ल्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग सारख्या अनेक बड्या खेळाडूंनी पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडण्यात यावे असा पवित्रा घेतला. तसेच येत्या विश्व चषकात भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना न खेळण्याचीही मागणी उठू लागली. यावर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने …

शोएब अख्तर म्हणतो, 'पाकिस्तानसोबत न खेळण्याचा भारताला पूर्ण हक्क, पण...'

नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रभाव भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडूंवरही झाला आहे. या हल्ल्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग सारख्या अनेक बड्या खेळाडूंनी पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडण्यात यावे असा पवित्रा घेतला. तसेच येत्या विश्व चषकात भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना न खेळण्याचीही मागणी उठू लागली. यावर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने त्याचं मत मांडलं आहे. भारताला पाकिस्तानसोबत न खेळण्याचा पूर्ण हक्क आहे, पण यावर राजकारण करु नये, असे शोएब म्हणाला.

रावलपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवांनांबाबत दु:ख व्यक्त केलं.

‘भारत त्या देशासोबत खेळायला नकार देऊ शकतो, ज्याने त्यांच्या देशासोबत वाईट केलं. पण माजी खेळाडू ज्याप्रकारे क्रिकेटला राजकारणाशी जोडत आहेत, ते चुकीचे आहे’, असे मत शोएबने एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना मांडले.

शोएबने पाकिस्तानच्या पंतप्रधानांची बाजूही घेतली. ‘खेळात राजकारण व्हायला नको, मला याचं फार दु:ख आहे की भारताच्या जवानांना हे सर्व सहन कराव लागलं. पण माझ्या देशाबाबत सांगायचं झालं तर आम्ही सर्व एक आहोत. आमच्या मनात एकतेची भावना आहे आणि मी आमच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याचं समर्थन करतो’, असेही तो म्हणाला.

‘भारताला विश्व चषकात पाकिस्तानसोबत सामना न खेळण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या देशावर आत्मघाती हल्ला झाला आहे. या विषयावर आम्ही चर्चा करणे बरोबर नाही’, असेही शोएब म्हणाला.

यातच बीसीसीआयचे प्रशासक विनोद राय यांनी सीईओ राहुल जोहरी यांना आयसीसीला पत्र पाठवून पाकिस्तानला विश्वचषकातून हटवण्यास सांगितलं आहे. तर दुसरीकडे भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर विश्वचषकात पाकिस्तानसोबत सामना न खेळण्याच्या मागणीला विरोध केला आहे. जर भारताने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना खेळला नाही, तर नुकसान भारताचंच होईल, असं सुनील गावसकर म्हणाले. आयसीसी त्यासाठी प्रयत्न करु शकतात. मात्र, पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर काढण्याची मागणी मान्य होणार नाही. कारण यासाठी इतर देशांच्या सदस्यांनीही हे स्वीकारायला हवे आणि असं होणं शक्य नाही. त्यामुळे समना न खेळता पाकिस्तानला फुकटचे 2 गुण देण्यापेक्षा त्यांना मैदानात हरवा, असे गावस्कर म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *