AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : फक्त रोहितच्या निर्णयाची प्रतिक्षा, शुबमन नाही हा खेळाडू होणार वनडे टीमचा कॅप्टन! BCCI चा प्लान तयार

Team India : BCCI चा प्लान तयार असल्याच वृत्त आहे. सर्वांना असं वाटतय की, शुबमन गिललाच वनडे, टी 20 आणि टेस्ट टीमच कॅप्टन बनवलं जाईल. सध्या गिल टेस्ट टीमचा कॅप्टन आहे. T20 मध्ये उपकर्णधार आहे. पण त्याला वनडे टीमच कॅप्टन बनवणार नाही. बीसीसीआयने त्यासाठी वेगळ्याच नावाचा विचार केलाय.

Team India : फक्त रोहितच्या निर्णयाची प्रतिक्षा, शुबमन नाही हा खेळाडू होणार वनडे टीमचा कॅप्टन! BCCI चा प्लान तयार
Team India
| Updated on: Aug 21, 2025 | 10:07 AM
Share

श्रेयस अय्यरला आशिया कपच्या टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. पण BCCI चा त्याच्यासाठी वेगळा प्लान आहे. रिपोर्ट्नुसार श्रेयस अय्यरला वनडे टीमच कॅप्टन बनवलं जाऊ शकतं. सरपंच साहेब म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रेयस अय्यरचं येणाऱ्या दिवसात टीम इंडियात पुनरागमन होईल पण ते एका मोठ्या जबाबदारीसह. रिपोर्टमध्ये असं म्हटलय की, टेस्ट कॅप्टन बनवण्यात आलेल्या शुबमन गिलला T20 टीमच सुद्धा कॅप्टन बनवलं जाऊ शकतं. सध्या सूर्यकुमार यादव T20 टीमचा कॅप्टन आहे. तो आता 34 वर्षांचा आहे. BCCI युवा कर्णधाराच्या शोधात आहे. त्या दृष्टीने शुबमन गिलला सूर्यकुमार यादवचा पर्याय म्हणून पाहता येईल.

श्रेयस अय्यरला वनडे टीमच कॅप्टन बनवण्याचा BCCI चा प्लान आहे. पण तो प्रत्यक्षात कधी येणार? दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार, BCCI सूत्रांनी सांगितलं की, याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल. आशिया कपनंतर एक मोठी बैठक होईल. यात रोहित-विराटशी चर्चा करुन त्यांच्या भविष्याबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो. टेस्ट आणि T20 मधून निवृत्ती स्वीकारणारे रोहित-विराट आपल्या भविष्याबद्दल जो निर्णय घेतील, त्यानुसार पुढची रणनिती ठरवली जाईल. त्याच रणनिती अंतर्गत श्रेयस अय्यरला कॅप्टन बनवलं जाऊ शकतं. श्रेयस अय्यरला 2027 वनडे वर्ल्ड कप आधी वनडे टीमच नेतृत्व दिलं जाऊ शकतं. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.

खेळाडू आणि कॅप्टन म्हणून उतरणं यात फरक

BCCI च्या मते सध्या जितकं क्रिकेट खेळलं जातय, त्यात कुठल्या एका खेळाडूसाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये कॅप्टन बनून राहणं सोप नाहीय, असं रिपोर्टमध्ये म्हटलय. एक खेळाडू म्हणून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणं आणि एक कॅप्टन म्हणून तिन्ही फॉर्मेटमध्ये उतरण खूप फरक आहे.

बीसीसीआयने आपली धोरण स्पष्टता दाखवून दिलीय

BCCI एकाबाजूला श्रेयस अय्यरला वनडे कॅप्टन बनवण्याच्या मूडमध्ये आहे, त्याचवेळी शुबमन गिलला टेस्टसोबतच T20 च कॅप्टन बववण्याचा विचार आहे. रिपोर्टनुसार आशिया कपसाठी शुबमन गिलला उपकर्णधार बनवून बीसीसीआयने आपली धोरण स्पष्टता दाखवून दिलीय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.