टी ट्वेण्टीत श्रेयस अय्यरचं वादळ, 38 चेंडूत शतक, 15 सिक्सर

Syed Mushtaq Ali Trophy 2019 मुंबई: मुंबईचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने (shreyas iyer ) सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेत तुफानी खेळी केली. श्रेयसने सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 38 चेंडूत शतक ठोकलं. या सामन्यात श्रेयसने झंझावाती खेळी करत अवघ्या 55 चेंडूत147 धावा ठोकल्या. या वादळी खेळीमुळे टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक (147) धावा ठोकणारा तो भारताचा पहिला […]

टी ट्वेण्टीत श्रेयस अय्यरचं वादळ, 38 चेंडूत शतक, 15 सिक्सर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

Syed Mushtaq Ali Trophy 2019 मुंबई: मुंबईचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने (shreyas iyer ) सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेत तुफानी खेळी केली. श्रेयसने सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 38 चेंडूत शतक ठोकलं. या सामन्यात श्रेयसने झंझावाती खेळी करत अवघ्या 55 चेंडूत147 धावा ठोकल्या. या वादळी खेळीमुळे टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक (147) धावा ठोकणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. टी 20 प्रकारात 24 वर्षीय श्रेयसने रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे.

श्रेयस अय्यरने 55 चेंडूत 15 षटकार आणि 7 चौकारांसह 147 धावा कुटल्या. त्याने तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसह (33 चेंडूत 63) 213 धावाांची भागीदारी केली. या तुफानी खेळीमुळे मुंबईने 20 षटकात 4 बाद 258 असा धावांचा डोंगर उभारला. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर मुंबईच्या टीमने शेवटच्या 4 षटकात अवघ्या 23 धावा बनवल्या. अन्यथा मुंबईची धावसंख्या आणखी वाढली असती. दरम्यान 258 धावांचा पाठलाग करणाऱ्या सिक्कीमने 20 षटकात 7 बाद 104 धावांपर्यंतच मजल मारली. त्यामुळे मुंबईने हा सामना तब्बल 154 धावांनी जिंकला.

श्रेयस अय्यरचा विक्रम इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यातील तुफानी खेळीमुळे श्रेयसने टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान मिळवला आहे. यापूर्वी रिषभ पंतने 20 मे 2018 रोजी फिरोजशाह कोटला मैदानात दिल्ली डेयरडेव्हिल्सकडून खेळताना सनरायजर्स हैदराबादविरोधात 63 धावांत 128 धावांची खेळी केली होती.

दरम्यान, श्रेयसने कालच्या सामन्यात अवघ्या 38 चेंडूत शतक ठोकलं. हे भारतीय फलंदाजाने टी20 मध्ये ठोकलेलं चौथं जलद शतक ठरलं. रिषभ पंतने दिल्लीकडून हिमाचल प्रदेशविरोधात 32 चेंडूत शतक ठोकलं होतं. ते टी20 मधील दुसरं वेगवान शतक होतं. टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 30 चेंडूत शतक ठोकलं होतं.

याशिवाय रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत तर युसूफ पठाणने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध 37 चेंडूत शतक झळकावलं होतं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.