AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shreyas Iyer Double Century : टेस्टमध्ये श्रेयस अय्यरची T20 स्टाइलमध्ये तुफानी बॅटिंग, थेट डबल सेंच्युरी

Shreyas Iyer Double Century : श्रेयस अय्यरचा मागच्या तीन वर्षांपासून दुखापत आणि सर्जरीमुळे संघर्ष सुरु होता. त्यामुळे त्याचं प्रदर्शन सुद्धा खूप खराब होतं. मागच्या 38 इनिंगमध्ये तो फर्स्ट क्लासमध्ये एकही शतक झळकवू शकला नव्हता. नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध श्रेयस अय्यरने डेब्यु केला.

Shreyas Iyer Double Century : टेस्टमध्ये श्रेयस अय्यरची T20 स्टाइलमध्ये तुफानी बॅटिंग, थेट डबल सेंच्युरी
shreyas iyer mumbai battingImage Credit source: PTI
| Updated on: Nov 07, 2024 | 1:40 PM
Share

श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफी स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजी केली आहे. त्याने अवघ्या 201 चेंडूत 200 धावा ठोकल्या आहेत. एलीट ग्रुप ए मध्ये मुंबई आणि ओदिशामध्ये रणजी सामना सुरु आहे. मॅचच्या पहिल्या दिवशी अय्यर शतक झळकवून नाबाद होता. दुसऱ्यादिवशी त्याने ही शतकी खेळी डबल सेंच्युरीमध्ये बदलली. मुंबईचा श्रेयस अय्यर त्याची संपूर्ण इनिंग T 20 स्टाइलमध्ये खेळला. त्याने चौकार लगावले. अय्यरने 228 चेंडूत 233 धावा फटकावल्या. यात 23 फोर आणि 9 सिक्स आहेत. म्हणजे त्याने आपल्या संपूर्ण इनिंगमध्ये 146 फक्त बाऊंड्रीमधून वसूल केल्या. अय्यरच्या फर्स्ट क्लास करियरमधील हा बेस्ट स्कोर आहे.

श्रेयसची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील ही तिसरी डबल सेंच्युरी आहे. त्याने 9 वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतकाचा दुष्काळ संपवला. त्याने याआधी 2015 साली रणजीमध्ये डबल सेंच्युरी झळकवली होती. अय्यरने 7 वर्षानंतर फर्स्ट क्लास मॅचमध्ये डबल सेंच्युरी झळकवली आहे. याआधी अय्यरने इंडिया ए कडून खेळताना 2017 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध 202 धावा फटकावल्या होत्या. श्रेयस अय्यरने पहिल्या दिवशी 101 चेंडूत शतक झळकावलं. दिवसाचा खेळ संपताना तो 18 चौकार आणि 4 सिक्ससह 152 धावांवर नाबाद होता.

श्रेयसच नाही, मुंबईच्या या फलंदाजाची सुद्धा दमदार बॅटिंग

श्रेयस अय्यरचा मागच्या तीन वर्षांपासून दुखापत आणि सर्जरीमुळे संघर्ष सुरु होता. त्यामुळे त्याचं प्रदर्शन सुद्धा खूप खराब होतं. मागच्या 38 इनिंगमध्ये तो फर्स्ट क्लासमध्ये एकही शतक झळकवू शकला नव्हता. नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध श्रेयस अय्यरने डेब्यु केला. खांद्याच्या दुखापतीमुळे तो त्रिपुरा विरुद्ध मागच्या रणजी सामन्यात खेळला नाही. दुखापतीमधून सावरल्यानंतर 6 नोव्हेंबरला त्याने ओदिशा विरुद्ध कमबॅक केलं. पहिल्याच दिवशी त्याने 101 चेंडूत शतक ठोकलं. अय्यर शिवाय सिद्धेश लाडने सुद्धा दमदार बॅटिंग केली. तो 165 धावांवर नाबाद राहिला. दोघांच्या फलंदाजीच्या बळावर मुंबई टीमने दुसऱ्या दिवसाच पहिलं सेशन संपण्याआधी 4 विकेट गमावून 556 धावा केल्या आहेत.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.