पंड्या, राहुल आऊट, द्रविडच्या फॅक्टरीत तयार झालेल्या खेळाडूला संधी

 मुंबई: टीम इंडियाचे क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि के एल राहुल यांना निर्लज्ज वक्तव्याप्रकरणी दणके बसणे सुरुच आहे. आधी एका वन डे सामन्यातून वगळण्यात आलेल्या पंड्या आणि राहुलला आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण वन डे मालिकेतून वगळलं आहेच, शिवाय त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही खेळवण्यात येणार नाही. पंड्या आणि के एल राहुलच्या जागी तामिळनाडूचा अष्टपैलू विजय शंकर आणि द्रविडच्या फॅक्टरीत …

पंड्या, राहुल आऊट, द्रविडच्या फॅक्टरीत तयार झालेल्या खेळाडूला संधी

 मुंबई: टीम इंडियाचे क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि के एल राहुल यांना निर्लज्ज वक्तव्याप्रकरणी दणके बसणे सुरुच आहे. आधी एका वन डे सामन्यातून वगळण्यात आलेल्या पंड्या आणि राहुलला आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण वन डे मालिकेतून वगळलं आहेच, शिवाय त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही खेळवण्यात येणार नाही. पंड्या आणि के एल राहुलच्या जागी तामिळनाडूचा अष्टपैलू विजय शंकर आणि द्रविडच्या फॅक्टरीत तयार झालेला पंजाबचा युवा फलंदाज शुभमन गिल यांचा समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी विजय शंकर भारतीय संघात असेल. तर शुभमन गिलला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आलं आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या आणि के एल राहुल यांना ऑस्ट्रेलिया दौरा मध्येच सोडून भारतात परतावं लागलं.

BCCI झटका देण्याच्या तयारीत, पंड्या-राहुल वर्ल्डकपमधूनही आऊट?

हार्दिक पंड्या ऐवजी विजय शंकर

तामिळनाडूचा विजय शंकर हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरीत दोन सामन्यांसाठी भारतीय संघात असेल. 27 वर्षीय विजय शंकर याआधीही भारताकडून खेळला आहे. शंकर मधल्या फळीत फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो. विजय शंकरने गेल्या वर्षी निदास ट्रॉफीमधून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

युवा शुभमन गिल

दुसरीकडे के एल राहुलच्या जागी पंजाबचा शुभमन गिलला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध 23 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या वन डे मालिकेसाठी तो भारतीय संघात असेल. वन डे आणि टी ट्वेण्टी सामन्यात तो भारताचं प्रतिनिधीत्व करेल.

पंजाबकडून खेळणारा शुभमन गिलने रणजी ट्रॉफीत उत्तम कामगिरी केली. 10 डावांमध्ये त्याने तब्बल 98.75 च्या सरासरीने 790 धावांचा रतीब घातला. त्याआधी गिलचा न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या अ संघात समावेश होता.

19 वर्षीय गिलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावा कऱणारा पहिला फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला. शिवाय पृथ्वी शॉ च्या युवा टीम इंडियाने जिंकलेल्या 19 वर्षाखालील वर्ल्ड कप टीममध्ये शुभमनचा समावेश होता. राहुल द्रविड प्रशिक्षक असलेल्या भारताच्या अंडर 19 संघाने विश्वचषक जिंकला होता.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), विजय शंकर, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि मोहम्मद शमी.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), केदार जाधव, विजय शंकर, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि खलील अहमद.

संबंधित बातम्या 

BCCI झटका देण्याच्या तयारीत, पंड्या-राहुल वर्ल्डकपमधूनही आऊट?   

हार्दिक पंड्याच्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच ही अभिनेत्री भडकली  

‘हार्दिक पंड्या-के एल राहुलसोबत प्रवास करणार नाही’  

निर्लज्जपणाचं वक्तव्य भोवलं, हार्दिक पंड्या-केएल राहुल आऊट 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *