AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI झटका देण्याच्या तयारीत, पंड्या-राहुल वर्ल्डकपमधूनही आऊट?

मुंबई: महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलेले क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि के एल राहुल यांना आणखी मोठा दणका बसू शकतो. दिग्दर्शक करण जोहरच्या  कॉफी विथ करण या शोमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पंड्या आणि के एल राहुल, यांच्यावर छी थू  होत आहे. त्यांच्यावर आता थेट वन डे विश्वचषकातूनच बाहेरचा रस्ता दाखवण्याची कारवाई होऊ शकते. क्रिकेट […]

BCCI झटका देण्याच्या तयारीत, पंड्या-राहुल वर्ल्डकपमधूनही आऊट?
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM
Share

मुंबई: महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलेले क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि के एल राहुल यांना आणखी मोठा दणका बसू शकतो. दिग्दर्शक करण जोहरच्या  कॉफी विथ करण या शोमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पंड्या आणि के एल राहुल, यांच्यावर छी थू  होत आहे. त्यांच्यावर आता थेट वन डे विश्वचषकातूनच बाहेरचा रस्ता दाखवण्याची कारवाई होऊ शकते. क्रिकेट प्रशासक समितीच्या सदस्य डायना इडुल्जी यांनी तसे संकेत दिले आहेत.

डायना इडुल्जी यांच्याच शिफारशीनंतर पंड्या आणि राहुलला पुढील कारवाईपर्यंत एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं. या शिफारशीपूर्वी त्यांनी कायदेशीर सल्ला घेतला होता. त्यावेळी या दोघांनी शिस्तभंगाच्या नियमाचं उल्लंघन केलं नाही, असं लॉ फर्मने सांगितलं. त्यानंतर डायना इडुल्जी यांनी चौकशीसाठी या दोघांच्या निलंबनाची शिफारस केली. त्यानंतर दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या वन डे सामन्यातून वगळण्यात आलं.

याबाबत अधिक माहिती देताना इडुल्जी म्हणाल्या, बीसीसीआय याप्रकरणी समितीची स्थापना करुन शिक्षेची मर्यादा निश्चित करेल. यावेळी इडुल्जी यांना पंड्या आणि राहुल 30 मेपासून सुरु होत असलेल्या वन डे विश्वचषकातही खेळू शकणार नाहीत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर इडुल्जी म्हणाल्या, हो तसंही होऊ शकतं.

लाजिरवाणं वक्तव्य

इडुल्जी यांनी पंड्या आणि राहुल यांचं वक्तव्य अतिशय लाजिरवाणं असल्याचं नमूद केलं. महिलांबाबत असं वक्तव्य करणं हे अत्यंत घाणेरडं आहे. क्रिकेटर्स हे लहान मुलांचे रोल मॉडेल असतात. त्यांच्या अशाप्रकारच्या वक्तव्यांमुळे बीसीसीआयची प्रतिमा मलिन झाली.

काय आहे प्रकरण?

हार्दिक पंड्या आणि के एल राहुल हे  दिग्दर्शक करण जोहरच्या प्रसिद्ध ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात  सहभागी झाले होते. यावेळी करणने या दोघांना त्यांच्या खासगी आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले. यावेळी पंड्याने त्याच्या आयुष्यातील काही खासगी गोष्टी उघड केल्या. पंड्याने सांगितले की, त्याचं कुटुंब खूप मॉडर्न आहे. पहिल्यांदा शारीरिक संबंधानंतर त्याने त्याबाबत घरी येऊन सांगितले की, ‘मी आज करुन आलो’. पंड्याने आणखी एक किस्सा सांगितला. तो त्याच्या आई-वडिलांना एका पार्टीत घेऊन गेला होता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला विचारले की, ‘कुठल्या मुलीला बघत आहेस?’, यावर हार्दिकने एकानंतर एक त्या पार्टीतील सर्व मुलींकडे बोट दाखवत म्हटले की, ‘मी सर्वांना बघत आहे.’

पंड्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरुन त्याच्यावर टीका होऊ लागली. त्याच्या या वागणुकीला लज्जास्पद असल्याचे सांगितले गेले. पंड्याच्या या वक्तव्याला महिला विरोधी आणि सेक्सिस्ट म्हटले गेले. सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका करण्यात आली.

यानंतर या दोघांवर प्रत्येकी दोन वन डे सामन्यांची बंदी घालण्यात यावी, अशी शिफारस क्रिकेट प्रशासक समिती म्हणजेच सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांनी केली. पंड्या आणि राहुलला बीसीसीआयने नोटीस पाठवत 24 तासात उत्तर मागितलं होतं. ज्यावर त्या दोघांनीही जे काही झाले, त्यावर माफी मागितली होती. मात्र विनोद राय दोघांच्याही स्पष्टीकरणाने समाधानी झाले नाहीत.

बीसीसीआयच्या कायदे समितीने या खेळाडुंच्या वादग्रस्त वक्तव्याला आचारसंहितेचा भंग घोषित करण्यास नकार दिला होता. यावर प्रशासक समितीच्या सदस्या डायना एल्डुजी यांनी हार्दिक पंड्या आणि केएल राहुलला पुढील कारवाईपर्यंत निलंबित करण्याची शिफारस केली. एडुल्जींनी सुरुवातीलाच या दोघांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यानंतर या प्रकरणाला कायदे समितीकडे सोपवण्यात आले.

‘त्यांच्या चुकीच्या वागणुकीवर निर्णय येईपर्यंत त्यांना निलंबित ठेवणे आवश्यक आहे, जसे बीसीसीआयचे सीईओ (राहुल जोहरी) बाबत करण्यात आलं होतं. जेव्हा त्यांना लैंगिक अत्यचाराप्रकरणी रजेवर पाठवण्यात आले होते’, अशी प्रतिक्रिया एडुल्जी यांनी दिली.

संबंधित बातम्या 

निर्लज्जपणाचं वक्तव्य भोवलं, हार्दिक पंड्या-केएल राहुल आऊट  

‘हार्दिक पंड्या-के एल राहुलसोबत प्रवास करणार नाही’

केएल राहुल आणि पंड्याच्या वक्तव्यावर विराट म्हणतो…  

‘ते’ वक्तव्य महागात, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या अडचणीत   

पंड्या म्हणतो, पहिल्यांदा शारीरिक संबंधानंतर घरी सांगितलं की… 

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.