पंड्या म्हणतो, पहिल्यांदा शारीरिक संबंधानंतर घरी सांगितलं की…

पंड्या म्हणतो, पहिल्यांदा शारीरिक संबंधानंतर घरी सांगितलं की...

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक करण जोहर याच्या प्रसिद्ध ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने पंड्या अडचणीत आला आहे. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे बीसीसीआय त्याच्यावर कारवाईही करु शकते.  ‘पहिल्यांदा शारीरिक संबंधानंतर मी त्याबाबत घरी येऊन सांगितले की, मी आज करुन आलो’, असं वक्तव्य हार्दिक पंड्याने केलं.  पंड्याच्या या वक्तव्यामुळे त्याचे चाहते खूप निराश झाले. सोशल मीडियात त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात येत आहे. याबाबत पंड्याने बीसीसीआय आणि चाहत्यांची जाहीर माफी मागितली. मात्र माफी पुरेशी नाही तर त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने केली.

हार्दिक पंड्या आणि के एल राहुल हे  दिग्दर्शक करण जोहरच्या प्रसिद्ध ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात  सहभागी झाले होते.  यावेळी करणने या दोघांना त्यांच्या खासगी आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले. यावेळी पंड्याने त्याच्या आयुष्यातील काही खासगी गोष्टी उघड केल्या. यादरम्यान त्याने अफेअर, डेटिंग आणि महिलांशी संबंधीत काही अशी उत्तरं दिली, जी ऐकल्यावर सर्वच आश्चर्यचकीत झाले.

पंड्याने सांगितले की, त्याचं कुटुंब खूप मॉडर्न आहे. पहिल्यांदा शारीरिक संबंधानंतर त्याने त्याबाबत घरी येऊन सांगितले की, ‘मी आज करुन आलो’. पंड्याने आपल्या जुन्या क्षणांना उजाळा देत आणखी एक किस्सा सांगितला. तो त्याच्या आई-वडिलांना एका पार्टीत घेऊन गेला होता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला विचारले की, ‘कुठल्या मुलीला बघत आहेस?’, यावर हार्दिकने एकानंतर एक त्या पार्टीतील सर्व मुलींकडे बोट दाखवत म्हटले की, ‘मी सर्वांना बघत आहे.’

View this post on Instagram

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

वादात अडकल्यानंतर पंड्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन जाहीर माफी मागितली. हार्दिक पंड्याने लिहिले की, ‘कॉफी विथ करणमध्ये मी केलेल्या वक्तव्यांमुळे जर कुणाचंही मन दुखावलं गेलं असेल, तर मी त्यांची माफी मागतो. खरं सांगायचं तर कार्यक्रमात मी वाहवत गेलो, मला कुणाचाही अपमान करायचा नव्हता. नाही कुणाच्या भावना दुखवायच्या होत्या. रिस्पेक्ट.’

पंड्याच्या या वादग्रस्त विधानावर बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘शो मध्ये हार्दिक जे बोलला, त्याने बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेटच्या प्रतिमेला गालबोट लागले आहे. केवळ माफी मागणे पुरेसे नाही तर हार्दिक पंड्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, जेणेकरुन तरुण खेळाडूंना धडा मिळेलं.’

Published On - 4:28 pm, Wed, 9 January 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI