IPL 2025 : बॉम्बस्फोटातून थोडक्यात वाचला, आता आयपीएलमध्ये ‘या’ टीमसाठी जीव ओतून खेळणार
IPL 2025 : आयपीएल टुर्नामेंट आता मध्यावर आली असताना एक प्रतिभावान खेळाडू टीममध्ये दाखल होणार आहे. त्याची बेस प्राइस 75 लाख रुपयात त्याला खरेदी केलय. 2 कोटीच्या खेळाडू स्पर्धेतून बाहेर गेला, त्याच्याजागी या खेळाडूची एन्ट्री झाली आहे.

IPL 2025 मध्ये अजून एका टॅलेंटेड खेळाडूची एन्ट्री झाली आहे. हा खेळाडू आपल्या आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जातो. शिवाय गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट आहे. हा खेळाडू आहे दासुन शनाका. दहशतवादी हल्ल्याच्यावेळी बॉम्बस्फोटाशी सामना झालेला शनाका आत आयपीएलमध्ये सरस खेळ दाखवण्यासाठी सज्ज आहे. गुजरात टायटन्सने त्याला ग्लेन फिलिप्सच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून टीममध्ये समावेश केला आहे. अलीकडेच फिलिप्सला फिल्डिंगच्यावेळी दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला अर्ध्यावरच टुर्नामेंटमधून बाहेर पडावं लागलं. आता त्याच्याजागी शनाका गुजरातकडून खेळेल.
गुजरात टायटन्सच्या फ्रेंचायजीने दासुन शनाकाला टुर्नामेंटमधील उर्वरित सामन्यांसाठी त्याची बेस प्राइस 75 लाख रुपयात खरेदी केलय. ग्लेन फिलिप्सला गुजरातने लिलावाच्यावेळी 2 कोटी रुपयात विकत घेतलं होतं. शनाकाची आयपीएलमध्ये खेळण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी 2023 च्या सीजनमध्ये तो गुजरात टायटन्सचा भाग होता. त्यावेळी त्याला फक्त 3 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती.
मॅच फिरवण्याची क्षमता
32 वर्षाचा दासुन शनाका T20 क्रिकेटमधील अनुभवी खेळाडू आहे. मिडल ऑर्डरमध्ये खेळणारा हा प्लेयर मॅच फिरवण्याची क्षमता ठेवतो. अलीकडे त्याने फ्रेंचायजी क्रिकेट आणि देशातंर्गत क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केलं आहे. त्या बळावर त्याला आयपीएलमध्ये एन्ट्री मिळाली आहे. अलीकडेच शनाकाने इंटरनॅशनल लीग T20 मध्ये मॅचविनिंग इनिंग खेळला होता. दुबई कॅपिटल्सला चॅम्पियन बनवण्यात त्याने महत्त्वाच योगदान दिलं होतं. ILT20 च्या 10 इनिंगमध्ये 27 च्या सरासरीने त्याने 202 च्या तुफानी स्ट्राइक रेटने 164 धावा केल्या होत्या. चार विकेट सुद्धा काढले होते.
त्याच्यासोबत काहीही घडू शकलं असतं
शनाकाने क्रिकइन्फोशी बोलताना सांगितलेलं की, “नेगोम्बो येथील सेबास्टियन चर्चमध्ये ईस्टरच्या दिवशी गेलो नव्हतो. कारण त्याच्या एकदिवस आधीच तो मोठा प्रवास करुन आला होता” या चर्चच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला. शनाका ईस्टरच्या दिवशी चर्चमध्ये गेला असता, तर त्याच्यासोबत काहीही घडू शकलं असतं. पण नशीब चांगलं होतं, चर्चमध्ये न गेल्यामुळे बचावला.
‘जे दृश्य मी तिथे पाहिलं, ते…’
“मी चर्चमध्ये जातो, पण त्यादिवशी मी दमलेलो. सकाळी मी घरी होतो, त्यावेळी आवाज ऐकला. लोक बोलत होते, चर्चमध्ये बॉम्बस्फोट झालाय. मी लगेच पळत त्या ठिकाणी गेलो, जे दृश्य मी तिथे पाहिलं, ते कधीच विसरु शकत नाही. पूर्ण चर्च उद्धवस्त झालेलं. लोकांचे मृतदेह बाहेर होते” असं दासुन शनाका म्हणाला.
