सिद्धेश लाडने पहिल्याच चेंडूत षटकार ठोकला, ड्रेसिंग रुममध्ये सेलिब्रेशन

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई : मागील 5 वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या संघात असलेल्या आणि तरीही एकही सामना न खेळू शकणाऱ्या सिद्धेश लाडने आज आपला पहिला सामना खेळला. यावेळी त्याने आपल्या पहिल्या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. त्याच्या या खेळीचे मुंबईन इंडियन्सच्या संघाने ड्रेसिंग रुममध्येच सेलिब्रेशन केले. मुंबई इंडियन्सने आपल्या जखमी कर्णधाराच्या जागेवर युवा ऑलराउंडर खेळाडू सिद्धेश लाडला संधी दिली […]

सिद्धेश लाडने पहिल्याच चेंडूत षटकार ठोकला, ड्रेसिंग रुममध्ये सेलिब्रेशन
Follow us on

मुंबई : मागील 5 वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या संघात असलेल्या आणि तरीही एकही सामना न खेळू शकणाऱ्या सिद्धेश लाडने आज आपला पहिला सामना खेळला. यावेळी त्याने आपल्या पहिल्या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. त्याच्या या खेळीचे मुंबईन इंडियन्सच्या संघाने ड्रेसिंग रुममध्येच सेलिब्रेशन केले.

मुंबई इंडियन्सने आपल्या जखमी कर्णधाराच्या जागेवर युवा ऑलराउंडर खेळाडू सिद्धेश लाडला संधी दिली आहे. त्यामुळे अखेर सिद्धेशला आपला पहिला आयपीएल सामना खेळण्याची संधी मिळाली. पर्याय म्हणून अनेक अनुभवी खेळाडू असतानाही रोहित शर्माच्या जागेवर सिद्धेशला खेळवण्याच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, मुंबई इंडियन्सने अखेर सिद्धेशला संधी देण्याचा निर्णय घेतला. सिद्धेशने 13 चेंडूत 15 धावा केल्या. यात 1 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे.

कोण आहे सिद्धेश लाड?

सिद्धेश लाडचा जन्म 23 मे 1992 ला मुंबई येथे झाला. सिद्धेश आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचे विशेष नाते आहे. दोघेही चांगले मित्र असून सिद्धेशचे वडील दिनेश लाड हे रोहित शर्माचे लहानपणीचे क्रिकेट कोच राहिले आहे. 26 वर्षीय ऑलराउंडर सिद्धेश लाडची गोष्ट तशी अगदी अनोखी आहे. मुंबई इंडियन्सने त्याला 2015 लाच आपल्या आयपीएल संघात घेतले. मात्र, तेव्हापासून सिद्धेशला मैदानात उतरण्याची संधी मिळालीच नाही. तब्बल 5 वर्षे सिद्धेश मुंबई इंडियन्सच्या संघात असूनही एकही सामना खेळू शकला नव्हता. अखेर 5 वर्षांनी त्याला आपला खेळ दाखवण्याची संधी मिळाली.

सिद्धेश लाड आणि हार्दिक पंड्या दोघांचीही बोली 2015 मध्येच लागली आणि दोघांनाही संधी मिळाली. मात्र, आज पंड्या एक नामवंत खेळाडू बनला आहे, तर सिद्धेश अजूनही आपली ओळख निर्माण करण्याची धडपड करत आहे.

पाहा व्हिडीओ: