Vaibhav Sooryavanshi: तो काय फ्लॉप…झिम्बाब्वेचा कॅप्टन सिकंदर रझाचं वैभवबद्दल मोठं विधान, Video Viral
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात वनडे मालिका सुरु होणार असून या मालिकेपूर्वी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने वैभव सूर्यवंशीबद्दल एक विधान केले आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना उद्या रंगणार आहे. आता या सामन्यापूर्वी पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत भारतीय संघाकडून उपकर्णधार तिलक वर्माने हजेरी लावली होती तर झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने हजेरी लावली होती. आता या मालिकेत पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीकडे लक्ष असणार आहे. कारण इंग्लंडमध्ये वैभव सूर्यवंशीचे भारतासाठीचे पदार्पण अपेक्षेप्रमाणे झाले नसेल, पण झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याला विश्वास आहे की, जर या 15 वर्षीय खेळाडूला योग्य प्रकारे सांभाळले. या उदयोन्मुख फलंदाजाने इंग्लंडमधील तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 14, 13 आणि 15 धावा केल्या. भारताने ही मालिका 0-4 ने गमावली. यापैकी दोन डावांमध्ये सूर्यवंशी जोफ्रा आर्चरच्या एका शॉर्ट बॉलवर बाद झाला.
रझा म्हणाला, “वैभव एक खूप प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. त्याला फ्लॉप म्हणणं चुकीचं आहे. जर 15 वर्षांचा मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असेल, तर केवळ दोन-तीन सामन्यांनंतर त्याच्यावर टीका करणे योग्य नाही. मला वाटते की वैभवच्या आसपास अनेक खूप चांगले वरिष्ठ क्रिकेटपटू आहेत. जर त्याला योग्य प्रकारे सांभाळले गेले, तर मला वाटते की वैभव Once in generation टॅलेंट बनू शकतो.” सूर्यवंशी हरारेला परतणार आहे, जिथे त्याने जानेवारीमध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध 80 चेंडूंमध्ये सामना जिंकून देणारी 175 धावांची खेळी केली होती. संजू सॅमसन संघात नसल्यामुळे, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या मालिकेत सूर्यवंशीला डावाच्या सुरुवातीला अधिक संधी मिळतील.
Sikandar Raza talking about Vaibhav Sooryavanshi. pic.twitter.com/4qOYUVyjHc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 21, 2026
रझा म्हणाला, “वैभवने गेल्या वर्षी जे केले, भारताच्या 19 वर्षांखालील संघासाठी जे केले आणि त्याच वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, ही कोणत्याही परिस्थितीत छोटी कामगिरी नाही. आजकाल अशा गोष्टी ऐकायला मिळत नाहीत. वैभव खास आहे. त्याला कसे हाताळले जाते हे महत्त्वाचे असेल. या मालिकेत दोन्ही देशांना समान संधी मिळेल. आम्हाला आमच्या संघावर पूर्ण विश्वास आहे. आमचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे आणि म्हणूनच, मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की ही मालिका खूप रोमांचक असेल.”
आता या मालिकेतील पहिला सामना उद्या रंगणार आहे. या सामन्याचे नाणेफेक हे 4.00 वाजता होईल आणि 4:30 वाजता सामना सुरु होईल. या मालिकेत भारतीय संघावर विशेष लक्ष असणार आहे. कारण आता पुन्हा एकदा मालिका गमावली तर भारतीय संघावर बॅक टू बॅक नामुष्की ओढवेल.