Mohmmed Siraj : सिराजला वगळण्याचं एक टक्का पण वाईट वाटत नाही… टीम इंडियाच्या कोचचं वादग्रस्त विधान
IND vs NZ 1st Test Match: भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामन्याता पहिला दिवस पार पडला. या सामन्यात सिराजला वगळ्यात आले आता यावर कोचने प्रतिक्रिया दिली आहे.

IND vs NZ 1st Test: वेलिंग्टन कसोटीतील कामगिरीपेक्षा भारताचा प्लेइंग इलेव्हनची अधिक चर्चेत आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजसारख्या अनुभवी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून वगळले, या निर्णयामुळे अनेक क्रिकेट तज्ञांमध्ये गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. समालोचनादरम्यान सुनील गावस्कर, अजय जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. भारतीय संघ व्यवस्थापनाला या निर्णयात कोणतीही अडचण दिसत नाही. वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या दिवसानंतर फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक म्हणाले की, मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळणे हा चुकीचा निर्णय नव्हता.
माध्यमांशी बोलताना सितांशु कोटक म्हणाले की, वेलिंग्टन कसोटीतील परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय संघाने सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडला आहे. ते म्हणाले, “परिस्थिती आणि प्रतिस्पर्धी संघ लक्षात घेता, कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाला वाटते की ही सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन आहे. वैयक्तिकरित्या, मला वाटत नाही की सिराजला वगळणे हा चुकीचा निर्णय होता.”
सितांशु कोटक म्हणाले की, “प्रसिद्ध कृष्णाला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडणे हा योग्य निर्णय होता. कृष्णा एक आक्रमक गोलंदाज आहे. त्याच्याविरुद्ध धावा केल्या जाऊ शकतात. जेव्हा तो विकेट घेतो तेव्हा तो लोकांना आवडतो, पण जेव्हा तो धावा देतो तेव्हा ते नाराज होतात. आम्ही वेलिंग्टन कसोटीसाठी दोन स्विंग गोलंदाज आणि दोन सीम गोलंदाज निवडले. आम्ही प्रत्येक दिवसाच्या आधारावर संघाची निवड केली. न्यूझीलंडकडे मोठ्या संख्येने डावखुरे फलंदाज आहेत, त्यामुळेच सुंदरचा संघात समावेश करण्यात आला.”
वेलिंग्टन कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या विजयाचा ठरला. संघाने अवघ्या ७० धावांत पाच विकेट गमावल्या, पण त्यानंतर हेन्री निकोल्सने शतक झळकावून सामन्याचे चित्र पालटले. त्याने ग्लेन फिलिप्ससोबत १७३ धावांची भागीदारी करून न्यूझीलंडला पाच गडी गमावून २४३ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. भारतीय गोलंदाजांमध्ये बुमराहने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर कंबोज आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.