यार अब हम ना रहे.. स्मृती मानधनासाठी टीम इंडियाच्या मैत्रिणींकडून भावूक परफॉर्मन्स

टीम इंडियातील महिला क्रिकेटर्सनी स्मृतीसाठी हा खास डान्स परफॉर्मन्स केला होता. हा परफॉर्मन्स पाहून स्मृतीसुद्धा भावूक झाली होती. तिने स्टेजवर येऊन सर्वांना मिठी मारली. जेमिमा, अरुंधरी, यस्तिका, श्रेयांका, राधा यांनी हा डान्स सादर केला होता.

यार अब हम ना रहे.. स्मृती मानधनासाठी टीम इंडियाच्या मैत्रिणींकडून भावूक परफॉर्मन्स
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा संगीत सोहळा
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 23, 2025 | 11:55 AM

टीम इंडिया वुमेनची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छाल आज (23 नोव्हेंबर 2025) लग्नबंधनात अडकले. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत त्यांच्या विवाहपूर्वीचे विविध कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडत आहेत. शुक्रवारपासून मेहंदी, हळद, संगीत अशा विविध विधींना सुरुवात झाली. लग्नाच्या आदल्या दिवशी जंगी संगीत सोहळासुद्धा पार पडला. यावेळी अनेकांच्या डान्स परफॉर्मन्सने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. खुद्द स्मृती आणि पलाश यांनीसुद्धा धमाल डान्स केला. तर स्मृतीच्या भारतीय टीममधील मैत्रिणींनीही खास डान्स तयार केला होता. ‘तेरा यार हूँ में’ या गाण्यावर जेमिमा, श्रेयांका, अरुंधती यांनी परफॉर्मन्स सादर केला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी स्मृती आणि पलाशच्या लग्नसोहळ्यात धमाल केली आहे. त्यांचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हळदीच्या कार्यक्रमातील जेमिमाच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर वर पक्ष आणि वधू पक्ष यांच्यात क्रिकेटचा सामनाही झाला. या सामन्याची नाणेफेक जरी पलाशने जिंकली असली तरी सामनान मात्र स्मृतीच्याच टीमने जिंकला. तर संगीत सोहळ्यात श्रेयांका पाटील, जेमिमा रॉड्रीग्ज, यस्तिका भाटिया, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांनी स्मृतीसाठी खास परफॉर्मन्स सादर केला.

‘तेरा यार हूँ में’ या गाण्यावर त्यांनी डान्स केला आणि शेवटी स्मृतीला फ्लाइंग किस करत परफॉर्मन्स संपला. त्यांचा हा खास परफॉर्मन्स पाहिल्यानंतर भावूक झालेल्या स्मृतीने पुढे येत सर्वांना मिठी मारली. यावेळी सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

स्मृती आणि पलाश हे 2019 पासून सोबत आहेत. जुलै 2024 मध्ये रिलेशनशिपला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित प्रेमाची जाहीर कबुली दिली. तोवर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा होत्याच, पण दोघांनी त्यावर कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती. भारताने वर्ल्ड कप पटकावल्यानंतर पलाशने स्मृतीसोबतचा फोटोही शेअर केला होता. पलाशने क्रिकेटच्या मैदानावरच स्मृतीला लग्नासाठी प्रपोज केलं. या प्रपोजलचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.