Smriti Mandhana Marriage : स्मृतीच्या टीम इंडियातील जवळच्या मैत्रिणीने पलाशबाबत उचललं धक्कादायक पाऊल, लग्नात काहीतरी मोठं घडल्याचे स्पष्ट संकेत
Smriti Mandhana Marriage : सध्या सोशल मिडिया आणि सगळीकडे स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या अचानक रद्द झालेल्या लग्नाची चर्चा आहे. कारण आता पलाश बाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. लग्नाच्या काही तास आधी नेमकं काय घडलं? हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे.

टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा 23 नोव्हेंबरला रविवारी सांगलीत फार्म हाऊसवर विवाह होणार होता. 20 नोव्हेंबरपासून लग्नाच्या विधींना सुरुवात झालेली. मेहेंदी, संगीत हे कार्यक्रम झालेले. लग्नाच्या काही तास आधी अचानक लग्न सोहळा रद्द करत असल्याचं जाहीर करण्यात आलं. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात येत असल्याच दोन्ही कुटुंबांकडून अधिकृतपणे सांगण्यात आलं. पण आता वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. पलाश मुच्छल स्मृतीची फसवणूक करत असल्याची चर्चा आहे. काही चॅट्स लीक झाले.पण याच्या सत्यतेची अजून पृष्टी झालेली नाही.
सध्या माध्यमांमध्ये स्मृती मानधना आणि पलाशच्या नात्याबाबत वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. या सगळ्या घडामोडींदरम्यान स्मृतीची टीम इंडियातील जवळची मैत्रीण राधा यादवने पलाशला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. अचानक असं स्मृतीच्या होणाऱ्या नवऱ्याला अनफॉलो का केलं? लग्नाआधी काहीतरी मोठं घडल्याचं संकेत देणारं हे पाऊल आहे. पलाश अजून इन्स्टाग्रामवर राधा यादवला फॉलो करतोय. लग्न पुढे ढकलल्याच जाहीर झाल्यानंतर स्मृतीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले लग्नाशी संबंधित सर्व व्हिडिओ डिलिट केलं. पलाशने सुद्धा लग्न सोहळ्याच्या पोस्ट डिलिट केल्या आहेत. पण जुने फोटो अजूनही तसेच आहेत.
मेरी डिकॉस्टाने काय स्पष्टीकरण दिलं?
स्मृती मानधनाने पलाशला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसे स्क्रीनशॉट व्हायरल झालेले. पण ही अफवा होती. दोघे अजूनही परस्परांना फॉलो करतायत. या प्रकरणात मेरी डिकॉस्टा नावाच्या मुलीचं नाव समोर आलं. तिचे पलाश सोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल झालेले. तिने देखील यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मेरीने सांगितलं की, “पलाशसोबत माझी चॅटिंग मे-जुलै 2025 मध्ये झालेली आहे.आमच्यात फक्त एक महिना बोलणं झालं” “माझं त्याच्यासोबत कोणतंही नातं नव्हतं. मी स्मृती मानधनाचा खूप आदर करते. लोकांना हे सगळं कळायला हवं म्हणूनच मी चॅटिंगचे स्क्रीनशॉट सगळीकडे पोस्ट केले. मी एक कोरिओग्राफर नाही” असही तिने स्पष्ट केलं.
