AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फॅन्ससाठी गुड न्यूज, स्मृती मंधाना लवकरच अडकणार लग्नबंधनात, या फेमस सिंगरच्या भावाला करत्ये डेट

भारतीय महिला क्रिकेट संघाची सुपरस्टार क्रिकेटर स्मृती मंधाना तिच्या चमकदार फलंदाजीशिवाय तिच्या सौंदर्य आणि वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. सध्या देखील स्मृती मंधानाच्या बॉयफ्रेंडबद्दल खूप चर्चा करत आहेत.

फॅन्ससाठी गुड न्यूज, स्मृती मंधाना लवकरच अडकणार लग्नबंधनात, या फेमस सिंगरच्या भावाला करत्ये डेट
| Updated on: Jan 27, 2024 | 3:57 PM
Share

Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची सुपरस्टार क्रिकेटर स्मृती मंधाना तिच्या चमकदार फलंदाजीशिवाय तिच्या सौंदर्य आणि वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. सध्या देखील स्मृती मंधानाच्या बॉयफ्रेंडबद्दल खूप चर्चा करत आहेत.  टीम इंडियाची शानदार खेळाडू स्मृती मंधाना एका प्रसिद्ध बॉलिवूड गायिकेच्या भावाला डेट करत असल्याची अफवा आहे. अनेक चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगची चर्चा सुरू झाली आहे.

कोणाला डेट करत्ये स्मृती ?

अलीकडे, तीन वर्षांनंतर, BCCI ने भारतीय क्रिकेटपटूंसाठी वार्षिक पुरस्कार कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये स्मृती मंधाना हिला BCCI तर्फे 2021-22 चा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. या पुरस्कारानंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिंगर पलक मुच्छाल हिचा भाऊ पलाश मुच्छाल याने स्मृतीला इन्स्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पलाश मुच्छाल आणि स्मृती यांच्या नात्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतात. बऱ्याच काळापासून दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहेत. मात्र त्यांच्यापौकी कोणीच यावर अद्याप मौन सोडलेलं नाही.

स्मृती मंधाना लवकरच करणार लग्न ?

भारतीय संघाची स्टार क्रिकेटर स्मृती मंधाना आणि बॉलीवूड गायक पलक मुच्छालचा भाऊ पलाश मुच्छाल हे दोघेही लवकरच लग्न करू शकतात, अशाही चर्चा सुरू आहेत. पलक मुच्छालचा भाऊ पलाश मुच्छाल हा देखील बॉलिवूड गायक आणि संगीतकार आहे. पलाश मुच्छाल आणि स्मृती मंधाना या दोघांचे कुटुंबियही अनेक प्रसंगी एकत्र दिसले होते. स्मृती मंधानाला पाठिंबा देण्यासाठी पलाश मुच्छाल अनेकदा स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी जातो. मात्र, स्मृती मंधाना किंवा पलाश मुच्छाल या दोघांनीही अद्याप त्यांचे नाते सार्वजनिक केलेले नाही. सध्या चाहते या दोघांच्या डेटींग आणि लग्नाबाबत अंदाज लावत आहेत.

Follow Us
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?