Video : क्विंटन डिकॉकची चतुर खेळी, ‘त्या’ एका इशाऱ्याने फकरची झुंजार इनिंग संपवली, द्विशतक 7 धावांनी हुकलं!

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान (South Africa vs Pakistan) यांच्यातील रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला 17 धावांनी नमवलं. परंतु या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज फकर झमानने (Fakhar Zaman) ज्या प्रकारे बॅटिंग केली, त्याने क्रिकेट वेड्या प्रेक्षकांच्या डोळ्याचं अक्षरश: पारणं फिटलंय.

Video : क्विंटन डिकॉकची चतुर खेळी, 'त्या' एका इशाऱ्याने फकरची झुंजार इनिंग संपवली, द्विशतक 7 धावांनी हुकलं!
पाकिस्तानी फलंदाज फकर झमानची झुंजार इनिंग...!
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 8:21 AM

मुंबई : दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान (South Africa vs Pakistan) यांच्यातील रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला 17 धावांनी नमवलं. परंतु या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज फकर झमानने (Fakhar Zaman) ज्या प्रकारे बॅटिंग केली, त्याने क्रिकेट वेड्या प्रेक्षकांच्या डोळ्याचं अक्षरश: पारणं फिटलं. त्याने 155 चेंडूत 193 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 18 चौकार आणि 10 षटकार लगावले. त्यांचं द्विशतक केवळ 7 धावांनी हुकलं आणि त्याला कारणीभूत ठरला दक्षिण आफ्रिकेचा चलाख, चतुर विकेट कीपर क्विंटन डिकॉकचा (Quinton de kock) तो एक इशारा…! (South Africa vs Pakistan Fakhar Zaman Miss Double Century Due To Quinton de kock Fake Fielding)

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान (South Africa vs Pakistan 2nd ODI) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम बॅटिंग करताना पाकिस्तानच्या बोलर्सला फोडून काढलं. निर्धारित 50 ओव्हर्समध्ये आफ्रिकेने 341 रन्स काढले.

आक्रमण कसं असावं, याचा वस्तुपाठ फकरने घालून दिला

प्रत्त्युतरादाखल पाकिस्तान संघाने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 324 धावा काढल्या. पाकिस्तानला या सामन्यात 17 रन्सने पराभव स्वीकारावा लागला. पण पाकिस्तानचा फखर झमान ज्या पद्धतीने खेळला, त्याचा खेळ पाहून क्रिकेट वेड्या प्रेक्षकांचं मन तृप्त झालं. दक्षिण आफ्रिकन बोलर्सवर त्याने ज्या पद्धतीने आक्रमण केलं, ते लाजवाब होतं. मोठा स्कोअर असताना, लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल आणि तेव्हा आक्रमण कसं असावं, याचा वस्तुपाठ काल फकरने घालून दिला. त्याने केवळ 155 चेंडूत 193 धावा फटकावल्या. या खेळीला त्याने 18 चौकार आणि 10 षटकारांचा साज चढवला. त्यांचं व्दिशतक केवळ 7 धावांनी हुकलं.

चतुर डिकॉकचा तो एक इशारा, अन् त्याचं द्विशतक हुकलं!

मैदानात फकर झमानचं वादळ आलं होतं. आफ्रिकन बोलर्सने त्याला आऊट करण्यासाठी जंग जंग पछाडलं. पण काही केल्या तो आऊट होत नव्हता. फकरने आफ्रिकन बोलर्सची डाळ शिजू दिली नाही. संधी मिळेल तेव्हा तो आक्रमण करत राहिला. 190 धावा क्रॉस केल्यानंतर त्याने सावध पवित्रा घेतला. 50 व्या ओव्हर्सच्या  पहिल्या चेंडूवर त्याने जोरदार फटका मारला. एक धाव पूर्ण केल्यानंतर तो दुसऱ्या धावेसाठी पळाला. जेव्हा तो दुसऱ्या धावेसाठी धावत होता तेव्हा चतुर डिकॉकने फकरला गाफिल ठेवण्यासाठी फिल्डर्सला नॉन स्टायकर एंडला बॉल फेकण्यासाठी सांगितलं.

डिकॉकचा प्लॅन फत्ते झाला. डिकॉकच्या इशाऱ्याकडे फकरने पाहिलं आणि त्यालाही वाटलं आता फिल्डर नॉन स्टायकर एंडला बॉल फेकणार… पण फिल्डरने डिकॉकच्या दिशेने बॉल फेकला आणि त्या बॉलने बरोबर स्टम्पचा वेध घेतला…. फकरची 193 धावांची झुंजार इनिंग संपुष्टात आली…! डिकॉकची फेक फिल्डिंग कामाला आली. फकर झमानच्या झुंजार खेळीबद्दल त्याला ‘मॅच ऑफ द मॅच’च्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

ट्विटरवर चाहते भडकले…

डिकॉकने आपल्या संघासाठी चतुर खेळी केली खरी पण चाहत्यांना डिकॉकचा चतुरपणा आवडला नाही. डिकॉकने मॅच स्पिरीट पाळलं नसल्याचा आरोप पाकिस्तानच्या चाहत्यांनी ट्विटरवर केलाय. डिकॉकच्या विरोधात पाकिस्तानी चाहत्यांनी कित्येक ट्विट केलेत.

(South Africa vs Pakistan Fakhar Zaman Miss Double Century Due To Quinton de kock Fake Fielding)

हे ही वाचा :

IPL 2021 | आतापर्यंत 3 खेळाडूंना कोरोना, बीसीसीआय ‘हे’ मोठं पाऊल उचलण्याची शक्यता

IPl 2021 : विराट कोहलीचा RCB संघ यंदा प्लेऑफ गाठणार नाही; ‘या’ माजी खेळाडूची भविष्यवाणी

Covid-19 : IPL सामने मुंबईबाहेर नेण्याच्या हालचाली, BCCI मोठा निर्णय घेणार?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.