खेळाडूंना नोकरीत आरक्षणाकरिता स्पर्धेत सहभागाची अट शिथील : क्रीडा मंत्री

आता ही अट शिथिल करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी दिली. (Sunil Kedar Comment Sports Player in government jobs)

खेळाडूंना नोकरीत आरक्षणाकरिता स्पर्धेत सहभागाची अट शिथील : क्रीडा मंत्री
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 7:31 PM

मुंबई : राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण आहे. मात्र यासाठी राष्ट्रीय, राज्य अजिंक्यपद स्पर्धेत किमान 60 टक्के राज्य, जिल्हे सहभागी होणे ही अट आहे. मात्र आता ही अट शिथिल करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी दिली. (Sunil Kedar Comment Sports Player in government jobs)

प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षणाकरिता बैठक आयोजित करण्यात आली होते. या बैठकीस क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया हे उपस्थित होते.

सर्व प्रकारच्या राष्ट्रीय, राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये संबंधित खेळाच्या एकविध क्रीडा संघटनेशी संलग्न असणाऱ्या जिल्हापैकी किमान 60 टक्के राज्य जिल्हे सहभागी असणे आवश्यक राहील. त्यानुसार मिळणारे लाभ हे शासन निर्णयानुसार मान्यता दिलेल्या अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खेळ प्रकारांनाच लागू असणार आहेत.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदके प्राप्त करणारे खेळाडू राष्ट्रास तसेच राज्यास लौकिक प्राप्त करून देत असतात. खेळाडूंना खेळामध्ये प्राप्त होणाऱ्या संधी आणि शैक्षणिक अर्हता मिळविण्याचा कालावधी एकच असल्याने त्यांना दोन्ही आधाडीवर सारख्याच प्रमाणात लक्ष देता येणे शक्य नसते. बऱ्याचदा त्यांची शैक्षणिक क्षेत्रात पिछेहाट होते. त्यामुळे नोकरी व्यवसायाच्या स्पर्धेत ते अन्य विद्याथ्यांशी स्पर्धा करु शकत नाहीत, ही बाब शासनाने विचारात घेतली आहे.

विविध शासकीय विभागात आणि शासनाच्या मालकीच्या व नियंत्रणाखाली असलेल्या महामंडळात, स्थानिक प्राधिकरणात व शासकीय सवलती प्राप्त केलेल्या संस्थामध्ये नोकरीसाठी अत्युच्च गुणवत्ताप्राप्त खेळाडूंकरिता 5 टक्के आरक्षण दिले आहे, अशी माहिती केदार यांनी दिली. (Sunil Kedar Comment Sports Player in government jobs)

संबंधित बातम्या : 

Ajinkya Rahane VIDEO | अजिंक्य रहाणे-आर्याचा भन्नाट डान्स, चेन्नईतील हॉटेलमध्ये बापलेकीचा फनटाईम

मोहम्मद शमी वडिलांच्या आठवणीने व्याकूळ, इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट, म्हणाला…

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.