होय.. मी समलिंगी आहे, ‘स्प्रिंट क्वीन’ दुती चंदचा खुलासा

मुंबई : भारताची सर्वात वेगवान महिला धावपटू दुती चंद ही समलैंगिक असल्याचा खुलासा स्वत: दुती चंदने केला. दुती चंद ही 23 वर्षीय खेळाडू आहे. तिने 100 मीटर स्प्रिंट प्रकारात राष्ट्रीय रेकॉर्ड केला आहे. तसेच तिने 2018 च्या आशियायी खेळांमध्ये दोन रौप्य पदकही मिळवले आहेत. अशा प्रकारे समलैंगिक संबंधांची कबुली दोणारी ती पहिला महिला खेळाडू आहे. …

होय.. मी समलिंगी आहे, ‘स्प्रिंट क्वीन’ दुती चंदचा खुलासा

मुंबई : भारताची सर्वात वेगवान महिला धावपटू दुती चंद ही समलैंगिक असल्याचा खुलासा स्वत: दुती चंदने केला. दुती चंद ही 23 वर्षीय खेळाडू आहे. तिने 100 मीटर स्प्रिंट प्रकारात राष्ट्रीय रेकॉर्ड केला आहे. तसेच तिने 2018 च्या आशियायी खेळांमध्ये दोन रौप्य पदकही मिळवले आहेत. अशा प्रकारे समलैंगिक संबंधांची कबुली दोणारी ती पहिला महिला खेळाडू आहे.

पुढील वर्षी वर्ल्ड चॅम्पिअनशिप आणि टोक्यो ऑलम्पिकमध्ये क्वॉलीफाय करण्यासाठी दुती चंद ही कठोर परिश्रम करत आहे. त्यामुळे दुतीने सध्या या नात्याला आधिकारीक रुप देण्याचं तात्पुर्त टाळलं आहे. ‘द संडे एक्स्प्रेस’ ला दिलेल्या मुलाखतीत दुती चंदने तिच्या समलैंगिक संबंधांचा खुलासा केला. “मला अशी एक व्यक्ती मिळाली आहे, जी माझ्या अत्यंत जवळची आहे. माझ्या मते प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याची स्वतंत्रता असायला हवी. मी नेहमीचं समलैगिंक लोकांचं समर्थन केलं आहे. ही एक व्यक्तीगत बाब आहे. सध्या माझं लक्ष्य वर्ल्ड चॅम्पिअनशिप आणि टोक्यो ऑलम्पिक आहे. पण भविष्यात मी त्या व्यक्तीसोबत सेटल होऊ इच्छिते”, असं दुती चंदने स्पष्ट केलं.

“सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 ला रद्द केलं. त्यानंतर माझ्यात एलजीबीटी कम्युनिटीच्या अधिकारांबाबत उघडपणे बोलण्याची हिम्मत आली. माझ्या या निर्णयाचा सन्मान व्हायला हवा”, असं मत दुती चंदने व्यक्त केलं.

“आयुष्यभर साथ देणारी कुठली व्यक्ती आपल्या जीवनात यावी, अशी माझी इच्छा होती. मला एका अशा व्यक्तीसोबत राहायचं होतं जी मला नेहमी माझ्या खेळासाठी प्रोत्साहित करेल. मी गेल्या 10 वर्षांपासून एक धावपटू आहे. पुढील पाच ते सात वर्षांपर्यंत मी धावत राहील. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मी जगभरात फिरत असते. हे सोपं नसतं. मलाही कुणाच्या आधाराची गरज असते”, अशी भावना दुती चंदने व्यक्त केली.

भारतात सर्वोच्च न्यायालयाने 377 रद्द केल्यानंतरही एलजीबीटी विवाहांना अद्याप मान्यता मिळालेली नाही. मात्र, समलिंगी लोकांच्या सोबत राहण्याविरोधात कुठल्याही प्रकारचा कायदा नाही. सप्टेंबर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 158 वर्ष जुन्या कायद्याला रद्द करत समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचा निर्णय दिला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *