T20 World Cup : श्रीलंकेचा क्रिकेटपटू बलात्कार करताना वारंवार गळा दाबत होता, पीडित महिलेचा गंभीर आरोप
दनुष्का गुनाथिलका हा श्रीलंका टीमचा खेळाडू आहे.

मुंबई : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील (Australia) सेमीफायनलचे सामने संपले आहेत. उद्या पाकिस्तान (PAK) आणि इंग्लंड (ENG) यांच्यात अंतिम सामना होणार आहे. मेलबर्नच्या मैदानात उद्या चाहत्यांना महामुकाबला दीडवाजल्यापासून पाहायला मिळणार आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत एक अजब प्रकार उजेडात आला आहे. श्रीलंका टीमच्या खेळाडूवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्या खेळाडूला सिडनीच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्या खेळाडूची कसून चौकशी सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
दनुष्का गुनाथिलका हा श्रीलंका टीमचा खेळाडू आहे. त्यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. विश्वचषक स्पर्धेत त्याने फक्त एक सामना खेळला आहे. दनुष्का गुनाथिलका जखमी झाल्याने त्याला इतर सामने खेळता आले नाहीत. त्याच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यापासून त्याची ऑस्ट्रेलिया पोलिस चौकशी करण्यात येत आहे. खेळाडूने केलेले सगळे आरोप फेटाळून लावले असल्याची माहिती न्यू साउथ वेल्स पुलिस डॉक्यूमेंट्स यांनी जाहीर केले आहे.
सध्या त्या महिलेला धोका असल्याचं तिनं म्हटलं आहे. त्याचबरोबर ज्यावेळी दनुष्का गुनाथिलका हा बलात्कार करीत होता, त्यावेळी त्याने वारंवार गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुद्धा महिलेने केला आहे.
ज्या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे, त्या महिलेची आरोग्य चाचणी करण्यात आली आहे. अद्याप त्याचा रिपोर्ट जाहीर करण्यात आलेला नाही. श्रीलंकेतील इतर खेळाडू मायदेशी परतले आहेत. श्रीलंकेची ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच झाल्यानंतर दनुष्का गुनाथिलकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
