T20 World Cup : या 4 भारतीय खेळाडूंची विश्वचषक संघात निवड झाली नाही, तर आश्चर्य वाटायला नको
भारतीय संघात अनेकांची वर्णी लागण्याची शक्यता नाही. भारताच्या माजी खेळाडूंनी सुद्धा एक लिस्ट तयार केली आहे.

आशिया चषकात (Asia Cup 2022) खराब कामगिरीमुळे भारतीय संघातील (India Team)खेळाडू पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या T20 विश्व चषकासाठी कोणत्या खेळाडूची निवड होईल हे अद्याप निश्चित झालेलं नाही. परंतु सोशल मीडियावर आत्तापासून चाहत्यांनी टीम इंडियाची लिस्ट तयार करायला सुरुवात केली आहे.
काल ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार अॅरोन फिंच न्यूझिलंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले आहे. तो वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. परंतु पुढच्या महिन्यात होणाऱ्या T20 विश्व चषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाचा तो कर्णधार असणार आहे.
भारतीय संघात अनेकांची वर्णी लागण्याची शक्यता नाही. भारताच्या माजी खेळाडूंनी सुद्धा एक लिस्ट तयार केली आहे. त्यामध्ये भुवनेश्वर कुमार, रवि बिश्नोई, आर. अश्विन, आवेश खान या खेळाडूंना चाहत्यांनी लिस्टमधून वगळले आहे.
