
इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या पाच टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये आतापर्यंत टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक विकेट काढल्या आहेत. पण मँचेस्टरमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात कदाचित सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केलं जाऊ शकतं. टीमच्या कोचने हे संकेत दिले आहेत. त्याने मोहम्मद सिराजबद्दल एक वक्तव्य करुन सर्वांनाच चकीत केलय. अजूनपर्यंत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या चौथ्या कसोटीत खेळण्याबद्दल संशय आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या असिस्टेंट कोचच्या वक्तव्याने सर्वांना चिंतेत टाकलं आहे. मोहम्मद सिराजने तीन कसोटी सामन्यात आतापर्यंत 13 विकेट काढल्या आहेत.
23 जुलैला मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. त्याआधी टीम इंडियाचे सहाय्यक कोच रयान टेन डोशेट यांना मोहम्मद सिराजसंबंधी एक मोठ वक्तव्य केलं आहे. बेकेनहॅम येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “भले वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडबद्दल चर्चा होत असेल, पण मोहम्मद सिराजचा वर्कलोडही तुम्ही लक्षात घेतला पाहिजे”
ही आपल्यासाठी सौभाग्याची गोष्ट
ते म्हणाले की, “इंग्लंड टूर एक मोठा दौरा आहे. त्यामुळे बुमराहसोबत सिराजचा वर्कलोडही मॅनेज करावा लागेल. आपल्याला अनेकदा असं वाटतं सिराज सारखा गोलंदाज असणं नॉर्मल आहे. पण सत्य हे आहे की, सिराजसारखा गोलंदाज असणं ही आपल्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे”
दोन वर्षांपासून सतत कसोटी क्रिकेट खेळतोय
“भले सिराज प्रत्येकवेळी विकेट घेऊ शकत नसेल पण त्याचा जोश नेहमी हाय असतो. प्रत्येकवेळी तो गोलंदाजी करतो तेव्हा असं वाटतं की आता काहीतरी खास होणार. सिराज कधी मेहनत करण्यापासून मागे हटत नाही. म्हणून त्याचं वर्कलोड मॅनज करणं सुद्धा तितकतच महत्त्वाच आहे. जेणेकरुन तो फिट राहील. सतत बेस्ट देऊ शकेल. मोहम्मद सिराज मागच्या दोन वर्षांपासून सतत कसोटी क्रिकेट खेळतोय” असं रयान टेन डोशेट म्हणाले.
“He’s got the heart of a lion..”
Team India’s Assistant Coach Ryan ten Doeschate shares glowing praise for Mohammed Siraj and provides a crucial update on Arshdeep Singh’s injury status. 👀#ENGvIND | 4th Test starts WED, 23rd JULY, 2:30 PM | Streaming on JioHotstar! pic.twitter.com/1mwRA2WNvb
— Star Sports (@StarSportsIndia) July 17, 2025
सर्वाधिक ओव्हर्स टाकण्यामध्ये तो जगात तिसऱ्या नंबरवर
मोहम्मद सिराज वर्ष 2023 पासून सतत कसोटी सामने खेळतोय. टीम इंडिया या काळात 27 कसोटी सामने खेळली आहे. त्यात 24 मॅचमध्ये मोहम्मद सिराज होता. या दोन वर्षात सर्वाधिक ओव्हर्स टाकण्यामध्ये तो जगात तिसऱ्या नंबरवर आहे. 2023 पासून तो 24 कसोटी सामने खेळलाय. 44 इनिंग्समध्ये 569.4 ओव्हर्स त्याने गोलंदाजी केली. त्यात 67 विकेट काढले.