AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI : महाभूकंप, गौतम गंभीरच्या निकटवर्तीयाला टीम इंडियातून हटवलं, त्याशिवाय अजून…

BCCI : IPL 2025 स्पर्धा सुरु असतानाच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने मोठं पाऊल उचललं आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीरच्या निकटवर्तीयाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

BCCI : महाभूकंप, गौतम गंभीरच्या निकटवर्तीयाला टीम इंडियातून हटवलं, त्याशिवाय अजून...
Team India Image Credit source: PTI
| Updated on: Apr 17, 2025 | 10:21 AM
Share

IPL 2025 सुरु असताना भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने टीम इंडियावर मोठी कारवाई केली आहे. बोर्डाने गौतम गंभीर यांचे निकटवर्तीय आणि भारतीय टीमचे सहाय्यक कोच अभिषेक नायर यांना हटवलं आहे, असा मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय. ऑस्ट्रेलियात यावर्षी झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील टीमच खराब प्रदर्शन आणि ड्रेसिंग रुममधील गोष्टी बाहेर लीक झाल्याच्या प्रकरणात बीसीसीआयने हे कठोर पाऊल उचललं आहे. अभिषेक नायर शिवाय फिल्डिंग कोच टी दिलीप आणि ट्रेनर सोहम देसाई यांना सुद्धा बाहेर करण्यात आलं आहे. रिपोर्ट्नुसार हे दोघे 3 वर्षापेक्षा जास्त काळ टीमसोबत होते. त्यामुळे नियमानुसार त्यांच्याजागी नवीन भरती केली जाणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर अवघ्या 8 महिन्यात बीसीसीआयने अभिषेक नायरला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. रिपोर्टनुसार, सध्या अभिषेक नायर आणि फील्डिंग कोच टी दिलीप यांच्या जागी सध्या कुठल्या दुसऱ्या कोचची नियुक्ती करणार नाही. कारण सीतांशु कोटक आधीपासूनच बॅटिंग कोच म्हणून टीमशी जोडलेले आहेत. तेच रायन टेन डेश्काटे ही असिस्टेंट कोचच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यावरच फिल्डिंग कोचची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

फक्त एक भरती होईल कोणाची?

टीम इंडियाचे ट्रेनर सोहम देसाई यांच्याजागी भरती केली जाऊ शकते. त्यांची जागा एड्रियन ले रॉक्स घेऊ शकतात. सध्या ते आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्स टीमशी संबंधित आहेत. याआधी त्यांनी कोलकाता नाइट रायडर्स टीमसोबतही काम केलं आहे. बीसीसीआयकडून या संबंधी अजून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अजून अधिकृत घोषणा बाकीच आहे. सध्या ट्रेनिंग असिस्टेंट राघवेंद्र, दयानंद गरानी, ​​फिजियोथेरेपिस्ट कमलेश जैन, मसाजर अरुण कनाडे, चेतन कुमार, राजीव कुमार, टीम ऑपरेशन्सचे मॅनेजर सुमित मल्लापुरकर, एक सिक्योरिटी मॅनेजरसह अनेक लोक टीम इंडियाचे सपोर्ट स्टाफ म्हणून काम करतायत.

सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा कधी?

आयपीएल 2025 ओपनिंग सेरेमनीच्यावेळी बीसीसीआयच्या एपेक्स कमिटीची एक बैठक झाली होती. त्यावेळी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टबद्दल खोलवर चर्चा झाली होती. बैठकीच्या दोन दिवसानंतर भारतीय महिला क्रिकेट टीमच्या कॉन्ट्रॅक्टची घोषणा करण्यात आली. पण पुरुष टीमच्या कॉन्ट्रॅक्टची घोषणा अजून झालेली नाही. सूत्रांनुसार, पुरुष टीमच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठे बदल पहायला मिळू शकतात. यात काही मोठ्या नावांना बाहेर केलं जाऊ शकतं. बीसीसीआय आयपीएलनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा करु शकते.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.