
इंग्लंड आणि भारतात पाचवा निर्णायक कसोटी सामना सुरु आहे. काल टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाला आणखी एक मोठा झटका बसला असता. सीरीजच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत दुखापतग्रस्त असल्यामुळे खेळत नाहीय. पाचव्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी भारताच्या आकाश दीपला गोलंदाजी करताना दुखापत झाली होती. हॅरी ब्रूकला गोलंदाजी करताना आकाश दीपला ही दुखापत झाली. हॅरी ब्रूकने जोरात फटका मारला, तो डायरेक्ट पायाला लागला. पण त्यानंतरही आकाश दीपने मैदान सोडलं नाही. या दरम्यान कॅप्टन शुबमन गिल आणि आकाश दीपमध्ये झालेली चर्चा स्टम्पच्या माइकमध्ये रेकॉर्ड झाली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय.
शुबमन गिलने आकाश दीपला विचारल, तू इंजेक्शन घेतलस का?. या सामन्यात वेगवान गोलंदाजांना खूप मदत मिळाली आहे. आकाश दीपने दुखापतीमुळे मैदान सोडलं असतं तर टीम इंडियाकडे मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा असे दोनच पर्याय उरले असते. पण आकाश दीपने मैदान सोडलं नाही. आकाश दीपने ब्रूकचा महत्त्वाचा विकेट काढून टीम इंडियाला सामन्यात आणलं.
टीम इंडियाला महत्त्वाचं यश मिळवून दिलं
हॅरी ब्रूकने शानदार फलंदाजी करुन 111 धावा केल्या. इंग्लंडने या सामन्यावर पकड मिळवलेली त्यावेळी आकाश दीपने ब्रूकची विकेट काढली. टीम इंडियाला महत्त्वाचं यश मिळवून दिलं. ब्रूकशिवाय जो रुटने 105 धावांच य़ोगदान दिलं.
टीम इंडियाला जिंकण्यासाठी तीन की चार विकेट काढाव्या लागतील
चौथ्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडच्या 6 विकेटवर 339 धावा झाल्या होत्या. त्यांना विजयासाठी अजून 35 धावांची गरज आहे. इंग्लंडने हे स्पष्ट केलय की, गरज पडली तर ख्रिस वोक्स शेवटच्या दिवशी मैदानात फलंदाजीला उतरेल. तिसऱ्यादिवशी फिल्डिंग करताना वोक्सच्या खांद्याला दुखापत झाली. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रुटने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, वेदना होत असल्या तरी इंग्लंड टीमला गरज असेल तर वोक्स फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.
याचा अर्थ असा आहे की, टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी चार विकेट काढावे लागतील. आजचा पाचवा दिवस दोन्ही टीम्ससाठी महत्त्वाचा आहे. आकाश दीपकडून टीम इंडियाच्या फॅन्सना भरपूर अपेक्षा आहेत.