World Cup : आम्ही कुणालाही पराभूत करु शकतो : विराट कोहली

समोर कोणताही संघ असू द्या, आपण खिलाडूवृत्तीने खेळणं आवश्यक आहे.

World Cup : आम्ही कुणालाही पराभूत करु शकतो : विराट कोहली

India vs Pakistan | मँचेस्टर (लंडन) : जर आम्ही चांगली खेळी केली, तर आम्ही कुणालाही पराभूत करु शकतो, असा विश्वास टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला. उद्या (16 जून) मँचेस्टरमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा हायव्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्याआधी विराट कोहलीने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने पाकिस्तानविरुद्धचा सामना सहज जिंकण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.

विराट कोहली काय म्हणाला?

“जर आम्ही चांगली खेळी केली, तर आम्ही कुणालाही पराभूत करु शकता. विरोधी संघ कोण आहे, याच्यानुसार आम्ही बदल करत नाही. समोर कोणताही संघ असू द्या, आपण खिलाडूवृत्तीने खेळणं आवश्यक आहे.” असे विराट कोहली म्हणाला.

तसेच, “कुठलाही सामना खास असे काही नाही. सर्व सामने सारख्याच जबाबदारीने आम्ही खेळतो. आम्ही ज्याप्रकारे सध्या क्रिकेट खेळतो आहे, ते जगभरातील क्रिकेट टीममध्ये सर्वोत्तम आहे.” असेही विराट कोहली म्हणाले.

भारत विरुद्ध पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना

भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना रविवार 16 जून रोजी होत आहे. क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या या सामन्यात कोण बाजी मारणार याचीच चर्चा जगभरात सुरु आहे. विराट कोहलीची टीम इंडिया विश्वचषकातील आपला विक्रम कायम ठेवणार की सरफराज अहमदची पाकिस्तानी टीम बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भारताने विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना हरवून झोकात सुरुवात केली आहे. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना पावसाने रद्द झाला. त्यानंतर आता भारत पाकिस्तानशी मुकाबला करण्यास सज्ज आहे. दुसरीकडे पाकिस्तानने विश्वचषकात चार सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एका सामन्यात विजय झाला आहे तर दोन सामन्यात पराभव झाला. एक सामना रद्द झाला.

के एल राहुल सलामीला आल्यास चौथ्या नंबरवर कोण खेळणार?

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तीन आठवडे संघाबाहेर पडला आहे. त्यामुळे भारतीय संघाची ऐन वर्ल्डकपमध्ये डोकेदुखी वाढली आहे. धवन तीन आठवडे संघाबाहेर असला तरी तो त्यानंतर तरी वर्ल्डकपमध्ये खेळू शकणार का हा प्रश्न अनुत्तरीत आहे. अशा परिस्थितीत धवनऐवजी रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार याबाबतची उत्सुकता आहे.

शिखर धवन बाहेर पडल्यामुळे सलामीसाठी के एल राहुलचा पर्याय कर्णधार विराट कोहलीकडे आहे. रोहितसोबत के एल राहुल सलामीला उतरु शकतो. राहुलने यापूर्वी भारताकडून अनेक सामन्यात सलामीला फलंदाजी केली आहे. त्यामुळे तो प्रबळ दावेदार असू शकतो. मात्र राहुल जर सलामीला आला तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला कोण उतरणार हा प्रश्न आहे.

नारायणगावचा पठ्ठ्या ओव्हल मैदानात गरजला, छत्रपती संभाजी महाराज की…जय! 

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी भारताकडे दिनेश कार्तिक, विजय शंकर आणि केदार जाधव यांचे पर्याय आहेत. सध्या केदार जाधव महेंद्रसिंह धोनीनंतर सहाव्या क्रमांकावर येतो. जर राहुल सलामीला उतरला तर त्याच्या जागी केदार जाधव किंवा संधी मिळाल्यास दिनेश कार्तिक चौथ्या क्रमांकावर दिसू शकतो.

विजय शंकरला संघात स्थान मिळण्याची शक्यता तुलनेने कमी आहे. दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

…तर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत

जर शिखर धवन वर्ल्डकप स्पर्धेतूनच बाहेर पडला, तर भारतीय संघा त्याच्याजागी नवा खेळाडू बोलावू शकतात. धवनऐवजी श्रेयस अय्यर किंवा ऋषभ पंत यासारख्या खेळाडूंना टीम इंडियाकडून बोलावणं येऊ शकतं. या दोन्ही खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती.

संबंधित बातम्या 

Shikhar Dhawan : भारताला झटका, शिखर धवन 3 आठवड्यांसाठी विश्वचषकातून बाहेर

 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, रायुडू, पंत बाहेर  

‘फादर्स डे’च्या दिवशी भारत-पाक सामना, ‘बाप’ जाहिरातीने पाकिस्तानी चिडले  

नारायणगावचा पठ्ठ्या ओव्हल मैदानात गरजला, छत्रपती संभाजी महाराज की…जय! 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *