मी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत

बंदी संपुष्ठात आल्यानंतर श्रीसंत पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. | team india player s.shreesanth ready to play cricket

मी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत

नवी दिल्ली : आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणात बंदी घातलेला क्रिकेटपटू एस श्रीसंत पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. “मला बोलवा, मी कुठेही क्रिकेट खेळायला तयार आहे” असं श्रीसंतने म्हटलं आहे. श्रीसंतवर आयपीएल 2013 च्या स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदी घालण्यात आली होती. ही बंदी बीसीसीआयने उठवली आहे. यानंतर श्रीसंत मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. (team india player s.shreesanth ready to play cricket )

श्रीसंतवर आयपीएल 2013 मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आजीवन बंदी घालण्यात आली होती. या बंदीविरोधात श्रीसंतने कोर्टात धाव घेतली होती. कोर्टातील वादावादीनंतर अखेर बीसीसीआयने ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला.

“मला बोलवा, मी कुठेही क्रिकेट खेळायला तयार आहे”, अशी प्रतिक्रिया बंदी उठवल्यानंतर श्रीसंतने दिली. यावेळी श्रीसंतच्या चेहऱ्यावर उद्विग्नता झळकत होती.

श्रीसंत काय म्हणाला ?

बंदी संपुष्ठात आल्यानंतर श्रीसंत पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. “मी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेतील काही जणांच्या संपर्कात आहे. या देशात क्लब क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं माझं लक्ष्य आहे. क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर एमसीसी आणि वर्ल्ड इलेव्हनविरोधात होणाऱ्या सामन्यात खेळण्याची इच्छा आहे”, असं श्रीसंत म्हणाला.

बीसीसीआयने 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंतवर आजीवन बंदी घातली होती. दिल्लीतील विशेष न्यायालयाने 2015 साली श्रीसंतला सर्व आरोपातून मुक्त केलं होतं. मात्र बीसीसीआयने घातलेली आजीवन बंदी केरळ उच्च न्यायालयाने 2018 ला उठवली होती. तसेच सर्व कार्यवाहीदेखील रद्द केली होती.

दरम्यान उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने आजीवन बंदीची शिक्षा कायम ठेवली होती. श्रीसंतने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने 2019 मार्चमध्ये सर्व आरोप कायम ठेवले होते. पण बीसीसीआयला श्रीसंतची शिक्षा कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आजीवन बंदी हटवून क्रिकेट बोर्डाकडून 7 वर्षांची बंदी घालण्यात आली. आता 7 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

एस श्रीसंतची कारकीर्द

शांताकुमार श्रीसंतने 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 37 वर्षीय श्रीसंतने टीम इंडियासाठी 53 वनडे, 27 कसोटी आणि 10 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. विशेष म्हणजे श्रीसंत 2007 च्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 च्या वन डे वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. श्रीसंतने 2007 च्या टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये मिस्बाह उल हकचा घेतलेला झेल अजूनही प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला लक्षात आहे.  (team india player s.shreesanth ready to play cricket )

संबंधित बातम्या : 

IPL 2020 : वेगापेक्षा वेगवान, चित्यासारखा चपळ, फिल्डिंगचा बादशाहा जॉन्टी ऱ्होड्सचा भन्नाट झेल

IPL 2020 | चेन्नईची दुसरी विकेट! रैनापाठोपाठ आणखी एका दिग्गज खेळाडूची माघार 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *