On This Day | 116 धावांचा यशस्वी बचाव, जाडेजाच्या फिरकीची धमाल, विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा U 19 वर्ल्ड कप विजय

टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत एकूण 4 वेळा अंडर 19 वर्ल्ड कप (u 19 world cup) जिंकण्याची कामगिरी केली आहे. भारताने 2000 मध्ये पहिल्यांदा मोहम्मद कॅफच्या नेतृत्वात हा वर्ल्ड कप जिंकला होता.

On This Day | 116 धावांचा यशस्वी बचाव, जाडेजाच्या फिरकीची धमाल, विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा U 19 वर्ल्ड कप विजय
excerpt : टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 4 वेळा अंडर 19 वर्ल्ड कप (u 19 world cup) जिंकण्याची कामगिरी केली आहे. भारताने 2000 मध्ये पहिल्यांदा मोहम्मद कॅफच्या नेतृत्वात हा वर्ल्ड कप जिंकला होता.

मुंबई : विराट कोहली  (Virat Kohli) टीम इंडियाचे (Team India) तिनही प्रकारात सध्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहे. विराट यशस्वीरित्या फलंदाज आणि कर्णधार अशा दोन्ही प्रकारची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आहे. पण आजपासून बरोबर 11 वर्षांपूर्वी विराटचे नेतृत्व उदयास आले होते. विराटने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात पराभूत करत 2 मार्च 2008 ला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकवून (Under 19 World Cup 2008)  दिला होता. या घटनेला आज 11 वर्ष पूर्ण झाले आहेत. या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या कोणत्या खेळाडूने कशी कामगिरी केली होती, हे सर्व आपण या निमित्ताने जाणून घेणार आहोत. (team india win under 19 world cup  against south africa on this day)

आफ्रिकेचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडले. टीम इंडियाची फार चांगली सुरुवात राहिली नाही. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला ठराविक अंतराने धक्के दिले. आफ्रिकेने भारताच्या एकाही फलंदाजाला मैदानात फार वेळ टिकून दिले नाही. विराट कोहली, मनिष पांडेसारखे फलंदाजांना सुरुवात तर चांगली मिळाली. पण या दोघांना या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. विराटने 19 तर पांडेने 20 धावा केल्या. टीम इंडियाकडून तन्मय श्रीवास्तवने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. टीम इंडियाला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आले नाही. भारताचा डाव 45.4 Overs मध्ये 159 धावांवर उरकला. आफ्रिकेकडून वेन पार्नेल, मॅथ्यू अर्नोल्ड आणि रॉय अॅडम्सने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.आफ्रिकेला विजयासाठी 160 धावांचे माफक आव्हान मिळाले.

आधीच आव्हान कमी, त्याच पावसाचा व्यत्यय

हा वर्ल्ड कप आफ्रिकेतच खेळवण्यात आला होता. यामुळे आफ्रिकेला होम कंडिनशनचा फायदा होता. त्यात 50 ओव्हरमध्ये 160 धावा म्हमजेच फार सोपं आव्हान होतं. त्यात पावसाने खोडा घातला. पाउस सुरु झाला. त्यामुळे आफ्रिकेला डकवर्थ लुईस नियमानुसार नवं आव्हान मिळालं. आफ्रिकेला 25 ओव्हरमध्ये आता विजयासाठी 116 धावांचे आव्हान मिळाले.

अर्गल आणि जाडेजाची गोलंदाजी

आफ्रिकेला आता विजयासाठी 116 धावा हव्या होत्या. पण टीम इंडियाने हार मानली नाही. भारतीय गोलंदाजांनी या आव्हानचं चांगल्या रित्या बचाव केला. अजितेश अर्गल आणि रवींद्र जाडेजाने आफ्रिकेला सुरुवातीला काही झटके दिले. त्यामुळे आफ्रिकेची 22-4 अशी नाजूक स्थिती झाली होती. सामना आता बरोबरीत आला होता. भारताला विजयासाठी 6 विकेट्सची आवश्यकता होती. तर आफ्रिकेला 94 धावांची गरज होती.

अशात रेजा हेंड्रिक्स आणि कर्णधार वेन पार्नेलने आफ्रिकेचा डाव सावरला. या दोघांनी आफ्रिकेला 70 धावांच्या पुढे नेले. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. तेवढ्यात टीम इंडियाच्या फिरकीने कमाल केली. रेजाला जाडेजाने आफ्रिकेच्या 72 धावा असताना बाद केलं. रेजाने 35 धावा केल्या.

यानंतर 75धावांवर आफ्रिकेला आणखी एक धक्का बसला. इक्बाल अब्दुल्लाने रॉय एडम्सला आऊट केलं. यानंतर मैदानात घट्ट पाय रोवून असलेला कर्णधार वेन पार्नेलला ही 26 रन्सवर कौलने मनिष पांडेच्या हाती कॅच आऊट केलं. यामुळे टीम इंडियाच्या वाटेतला मोठा अडथळा दूर झाला. अशा प्रकारे टीम इंडियाने आपल्या 116 धावांच्या आव्हानाचं शानदार पद्धतीने बचाव केलं. आफ्रिकेला 25 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 103 धावाच करता आल्या. यामुळे टीम इंडियाचा डकवर्थ लुईसनुसार 12 धावांनी विजय झाला. टीम इंडियाकडून रवींद्र जाडेजा, सिद्दार्थ कौल आणि अजितेश अग्रालने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर इक्बाल अबदुल्लाने 1 विकेट घेतली.

टीम इंडियाचा दुसरा वर्ल्ड कप विजय

टीम इंडियाची अंडर 19 वर्ल्ड कप जिंकण्याची ही दुसरी वेळ ठरली. सर्वात आधी मोहम्मद कैफच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2000 मध्ये पहिल्यांदा 19 वर्षाखालील वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली होती.

तन्मय श्रीवास्तवच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा

तन्मय श्रीवास्तवने या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. त्याने 6 सामन्यात 262 धावा चोपल्या. विराच कोहलीनेही 235 रन्स केल्या. आफ्रिकेचा कर्णधार वेन पार्नेल या स्पर्धेत सर्वाधिक 18 विकेट्स घेतल्या. तर टीम इंडियाकडून इक्बाल अबदुल्ला आणि रवींद्र जाडेजा या दोघांनी सर्वात जास्त विकेट्स मिळवल्या. या दोघांनी प्रत्येकी 10 फलंदाजांना बाद केलं. विराट कोहली, सौरभ तिवारी, जाडेजा, मनिष तिवारी सारख्या खेळाडूंना सिनिअर टीमकडून खेळण्याची संधी मिळाली. पण तन्मय श्रीवास्तव, अजितेश अर्गल आणि इकबाल अबदु्ल्ला यांच्या पदरी उपेक्षाच आली.

संबंधित बातम्या :

Vijay Hazare Trophy | सेहवागच्या पुतण्याचा धमाका, 9 व्या नंबरवर येऊन वादळी खेळी, तरीही टीमची बेईज्जती

Ravi Shastri | रवी शास्त्रींना कोरोना लस, नेटिझन्स म्हणतात आधी ‘डोस’ घेऊन आलात का?

(team india win under 19 world cup against south africa on this day)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI