टी-20 : टीम इंडियाची विंडीजवर मात, मालिकाही खिशात

चेन्नई : तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर मात करत, तीन सामन्यांची मालिकाही खिशात घातली आहे. विंडीजने नाणेफेक जिंकून, प्रथम फलंदाजी करत 181 धावांचं आव्हान भारतासमोर ठेवलं होतं. मात्र, शिखर धवनच्या 92 आणि ऋषभ पंतच्या 58 धावांच्या खेळीने भारताला विजय सोपा करुन दिला आणि अखेर 6 विकेट्स राखून भारताने विंडीला पराभवाची धूळ चारली. विंडीजविरोधात …

टी-20 : टीम इंडियाची विंडीजवर मात, मालिकाही खिशात

चेन्नई : तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर मात करत, तीन सामन्यांची मालिकाही खिशात घातली आहे. विंडीजने नाणेफेक जिंकून, प्रथम फलंदाजी करत 181 धावांचं आव्हान भारतासमोर ठेवलं होतं. मात्र, शिखर धवनच्या 92 आणि ऋषभ पंतच्या 58 धावांच्या खेळीने भारताला विजय सोपा करुन दिला आणि अखेर 6 विकेट्स राखून भारताने विंडीला पराभवाची धूळ चारली.

विंडीजविरोधात भारताच्या तीन टी-20 सामन्यांची मालिका होती. यातील तिन्ही सामने भारताने जिंकले, त्यामुळे मालिकाही भारताने 3-0 ने खिशात घातली आहे.

आजच्या सामन्यात शिखर धवन आणि ऋषभ पंतची फलंदाजी लक्षवेधी ठरली. 62 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकार ठोकून 92 धावा धवनने केल्या, तर दुसरीकडे ऋषभ पंत या युवा खेळाडूने अर्धशतक ठोकत 58 धावांपर्यंत मजल मारली. ऋषभने 38 चेंडून 58 धावा पूर्ण केल्या. त्यात त्याने 3 षटकार आणि 5 चौकार ठोकले. विशेष म्हणजे, आजचं अर्धशतक हे ऋषभच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधील पहिलं अर्धशतक ठरलं. त्यामुळे ऋषभसाठी आजची मॅच खास ठरली आहे.

दरम्यान, वेस्ट इंडिजला भारत दौऱ्यात विशेष काही यश संपादन करता आले नाही. कसोटी असो, वन डे असो वा आता टी-20 सामने असो, सगळ्यातच विंडीजचा संघ कमकुवत ठरला. अर्थात, विंडीजची टीम अत्यंत नवी असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा त्यांचा अनुभव कमी पडला. मात्र, तरीही अनेकवेळा विंडीजने भारतासारख्या बलाढ्य संघाला आव्हान देणारी कामगिरीही केली. मात्र, प्रत्येकवेळी भारताने विंडीजच्या कामगिरीला आव्हान देणारी आणि मात करणारी कामगिरी केल्याचेही दिसली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *