पहिल्या सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष, असा राहिला T20 World Cup चा पहिला दिवस
नामिबिया टीमची सुरुवात अत्यंत खराब झाली होती

काल ऑस्ट्रेलियात (Australia) विश्वचषक स्पर्धेला (T20 World Cup) सुरुवात झाली. पहिला सामना श्रीलंका (Shri Lanka) सहज जिंकेल अस सगळ्यांना वाटतं होतं. परंतु झालं उलट नामिबियाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे श्रीलंका टीमला पहिल्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. कालची मॅच नामिबियाच्या चाहत्यांच्या कायम लक्षात राहिल अशी होती. कारण नामिबिया खेळाडूंची T20 World Cup सुरु होण्यापुर्वी अजिबात चर्चा नव्हती.
A historic win for Namibia ?#T20WorldCup | #SLvNAM | ? https://t.co/vuNGEcX62U pic.twitter.com/AvCsiz9X7K
— ICC (@ICC) October 16, 2022
तसेच दुसरी मॅच युएसई आणि नेदरलॅंड यांच्यात झाली, त्यांच्यात सुद्धा अधिक संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही टीमनी अधिक संघर्ष केल्याने ती मॅच अखेरच्या षटकापर्यंत चालली. रोमांचक मॅचमध्ये नेदरलॅंडने युएसईला पराभूत केलं.
नामिबिया टीमची सुरुवात अत्यंत खराब झाली होती, त्यावेळी अधिक स्कोर करतील असं वाटतं नव्हतं. परंतु ज्यावेळी जेन फ्राइलिंक आणि जे स्मिट यांनी ज्यावेळी मोठी भागीदारी केली. त्यामुळे नामिबिया टीमचा स्कोर अधिक झाला.
श्रीलंकेच्या खेळाडूंना नामिबिया गोलंदाजांनी एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनमध्ये पाठवले. श्रीलंकेच्या कर्णधार अधिककाळ मैदानात स्थिरावला होता. परंतु त्यांच्याकडून अधिक धावा झाल्या नाहीत.
उर्वरित पात्रता सामन्यांचे वेळापत्रक (भारतीय वेळ)
17 ऑक्टोबर वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, होबार्ट, सकाळी 9.30 वा 17 ऑक्टोबर झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड, होबार्ट, दुपारी 1.30 वा 18 ऑक्टोबर नामिबिया विरुद्ध नेदरलँड्स, जिलॉन्ग, सकाळी 9.30 वा 18 ऑक्टोबर श्रीलंका वि UAE, जिलॉन्ग, दुपारी 1.30 वा 19 ऑक्टोबर स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड होबार्ट सकाळी 9.30 वा
19 ऑक्टोबर वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे होबार्ट, दुपारी 1.30 वा 20 ऑक्टोबर नेदरलँड विरुद्ध श्रीलंका, जिलॉन्ग, सकाळी 9.30 वा 20 ऑक्टोबर नामिबिया वि UAE, जिलॉन्ग, दुपारी 1.30 वा 21 ऑक्टोबर आयर्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, होबार्ट, सकाळी 9.30 वा 21 ऑक्टोबर स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे, होबार्ट, दुपारी 1.30 वा
