AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Champions trophy 2025 : काला कौआ काट खायेगा ! सामन्यापूर्वीच पाकिस्तानला हुडहुडी, रोहित शर्माचा पठ्ठ्या कमाल गाजवणार ?

चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला घरच्या मैदानावर, कराचीमध्ये न्युझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. आता, दुबईत उद्या होणाऱ्या सामन्यातही रोहित शर्माचा 'कौआ' पाकिस्तानसाठी खतरनाक ठरू शकतो. कसं ? चला, जाणून घेऊया. उद्या, अर्थात 23 फेब्रुवारी रोजी भारत वि. पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे.

Champions trophy 2025 : काला कौआ काट खायेगा ! सामन्यापूर्वीच पाकिस्तानला हुडहुडी, रोहित शर्माचा पठ्ठ्या कमाल गाजवणार ?
रोहित शर्माचा पठ्ठ्या कमाल गाजवणार ?
| Updated on: Feb 22, 2025 | 12:32 PM
Share

घड्याळाचे काटे जसजसे पुढे ,सरकत आहे, क्रिकेट प्रेमींच्या मनातील धडधड वाढू लागली आहे. कारण अवघ्या काही तासांतच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत वि. पाकिस्तान मॅचचे रणशिंग फुंकले जाणार आहे. खरंतर विराट, गिल आणि शमीसारख्या खेळाडे हे पाकिस्तानसाठी धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. पण, पाकिस्तान संघाला आता रोहित शर्माच्या ‘कौआ’ पासून धोका आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रोहित शर्माचा हा ‘कौआ’ अर्थात कावळा आला कुठून? पण हा ‘कौआ’ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अचानक आलेला नाही. तो तर टीम इंडिया आणि रोहित शर्मासोबत गेल्या 9 वर्षांपासून हे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हाही पाकिस्तानी संघ समोर येतो तेव्हा तो अशीच दमदार कामगिरी करतो, ज्या खेळीसाठी विराट कोहलीसुद्धा प्रसिद्ध आहे. रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा हा ‘कौआ’म्हणजे हार्दिक पंड्या.

हे वाचून लगेच पुढे धावून येण्यापेक्षा नीट वाचा, हार्दिक पंड्याला ‘कौआ’ किंवा ‘कावळा’ आम्ही म्हणत नाहीयोत. खरंतर त्याला हे नाव खुद्द रोहित शर्मानेच दिलं आहे.

रोहित- हरभजनचा व्हिडिओ, हार्दिकला म्हटलं ‘कावळा’!

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी रोहित शर्माचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तो हरभजन सिंगसोबत बोलताना दिसत आहे. याच संवादादरम्यान रोहित आणि हरभजन दोघेही हार्दिकला कौआ अर्थात कावळा संबोधतात. मात्र, हार्दिकला वाईट वाटेल असेही रोहित म्हणतो. त्याला हे नाव आवडत नाही. पण हरभजन त्यापुढे म्हणाला की तो तर आपला भाई आहे.

रोहितचा कौआ पाकिस्तानला सोडणार नाही !

रोहित शर्माचा ‘कौआ’ कोण आहे हे आता तुम्हाला कळलं आहे. पण हा ‘कौआ’ म्हणजेच हार्दिक पंड्या दुबईत पाकिस्तानसाठी कसा धोकादायक ठरू शकतो हेही जाणून घेऊया. खरंतर, हार्दिक त्याच्या बॉल आणि बॅटच्या तूफान कामगिरीमुळे पाकिस्तानसाठी धोकादायक ठरू शकतो. या व्हिडीओमध्ये हरभजन म्हणाला तसं, हार्दिक असा फलंदाज आहे ज्याच्याकडे खालच्या नंबरवर खेळायला येऊनही मोठे फटके मारण्याची क्षमता आहे.

पाकिस्तानला हार्दिकचा धोका किती ?

हार्दिक पांड्याला पाकिस्तानविरुद्ध खेळणे किती आवडते, याचा अंदाज तुम्ही त्या संघाविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या वनडे सामन्यांच्या आकडेवारीवरून लावू शकता. हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत 7 वनडे सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 4 डावात 70 (69.66) च्या सरासरीने 209 धावा केल्या आहेत. त्यादरम्यान हार्दिकने 11 षटकार आणि 13 चौकार लगावले. याशिवाय त्याने पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करत 8 विकेट्सही घेतल्या आहेत.

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.