AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus Test: ऑस्ट्रेलियन फिरकीपटू टॉड मर्फीनं दिग्गज फलंदाजानं नाचवलं, पदार्पणातील सामन्यातच दाखवली जादू

India Vs Australia 1st Test: भारतानं ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 177 धावांवर रोखलं होतं. भारत सहज मोठी आघाडी घेईल अशी आशा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली होती. पण मर्फीनं आपल्या फिरकीच्या जादूने भारतीय फलंदाजांना तारे दाखवले.

Ind vs Aus Test: ऑस्ट्रेलियन फिरकीपटू टॉड मर्फीनं दिग्गज फलंदाजानं नाचवलं, पदार्पणातील सामन्यातच दाखवली जादू
Ind vs Aus Test: फिरकीपटू मर्फीनं केली कमाल, पदार्पणातील सामन्यातच उडवली दिग्गज फलंदाजांची भंबेरीImage Credit source: ICC
| Updated on: Feb 10, 2023 | 4:05 PM
Share

नागपूर- ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. ही मालिका भारताला 3-0 ने जिंकायची आहे. कारण या निकालावरच भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधलं तिकीट निश्चित होणार आहे. त्या दृष्टीकोनातून भारतीय मातीत फलंदाज आणि गोलंदाजांचा कस लागणार आहे. पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 177 धावांवर गारद केला. गोलंदाजांनी कमावलं आणि फलंदाजांनी गमावलं अशीच काहीशी स्थिती दुसऱ्या दिवशी झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा वगळता एकही फलंदाज मैदानात तग धरु शकला नाही. ऑस्ट्रेलियन फिरकीपटून टॉड मर्फिनं आपल्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांना अक्षरश: नाचवलं. मर्फिनं केएल राहुल, रविचंद्रन अश्विन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि श्रीकर भारत यांना तंबूचा रस्ता दाखवला.

टॉड मर्फीनं घेतले पाच बळी

टॉड मर्फिनं पदार्पणाच्या सामन्यातच 5 गडी बाद करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. केएल राहुल 20 या धावसंख्येवर असताना मर्फीनं त्याला गोलंदाजी करत स्वत:च झेल घेत मैदानाबाहेर पाठवलं. त्यानंतर रविचंद्रन अश्विनला पायचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 62 चेंडूत 23 धावांची खेळी केली. चेतेश्वर पुजाराही मैदानावर जास्त काळ तग धरू शकला नाही. अवघ्या 7 या धावसंख्येवर असताना स्कॉट बोलँडकरवी झेल घेत बाद केलं. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीकडून बऱ्याच अपेक्षा असताना मर्फीच्या गोलंदाजीसमोर अक्षरश: नांगी टाकली. अवघ्या 12 या धावसंख्येवर बाद होत तंबूत परतला. श्रीकर भारतही पदार्पणाच्या सामन्यात साजेशी कामगिरी करु शकला नाही. अवघ्या 8 या धावसंख्येवर पायचीत होत बाद झाला.

जेसन क्रेझानंतर मर्फी हा दुसरा गोलंदाज आहे, ज्याने भारतात पाच गडी बाद करण्याचा विक्रम नोंदवला आहे. क्रेझाने नागपूरच्या मैदानात नोव्हेंबर 2008 साली 8 गडी बाद करत हा विक्रम प्रस्थापित केला होता. तसेच पदार्पणाच्या सामन्यात 5 गडी बाद करण्याच्या यादीत मर्फी ऑस्ट्रेलियाचा 37 वा खेळाडू आहे.

इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.

Follow Us
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात