
समय से पहले और किस्मत से ज्यादा न किसी को मिला है और न मिलेगा… अशी एक म्हण आहे. म्हणजेच तुमची वेळ येईपर्यंत आणि तुमच्या नशीबात असेल तेवढचं तुम्हाला मिळतं. काइम जॅमीसन हा खेळाडू याचं उत्तम उदारहण म्हणू शकतो. पुढल्या महिन्यात, म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी त्याला न्यूझीलंड संघात स्थान देण्यात आले नव्हते. तथापि, जेमीसन दृढ राहिला आणि त्याने मैदानावर आपले100% योगदान देणं सुरूचं ठेवलं.
आता, अचानक त्याचं नशीब बदललं असून न्युझीलंडचा वेगवान गोलंदाज ॲडम मिल्ने हा SA20 मध्ये झालेल्या दुखापतीमुळे T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी सिलेक्टर्सनी काइल जेमीसनला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतासाठी ठरू शकतो धोका
तब्बल 6 फूट 8 इंच उंची असलेल्या काइल जेमीसनने हे वारंवार सिद्ध केलंय की, दबावाखाली तो अधिक धोकादायक खेळाडू बनतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाविरुद्धची त्याची कामगिरी अजूनही लाखो भारतीयांना आठवत असेल. भारतीय फलंदाज अनेकदा काइल जेमीसनसमोर बळी पडतात, ते त्याच्या खराब तंत्रामुळे नव्हे तर संयम गमावल्यामुळे होतं. 2021 साली इंग्लंडमधील साउथहॅम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, जेमीसनने भारताविरुद्ध पहिल्या डावात 31 धावा देत 5 आणि दुसऱ्या डावात 30 धावा देत 2 बळी टिपवे, तसेच फलंदाजी करताना त्याने मौल्यवान अशा 21 धावाही केल्या. या उत्तम कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.
भारताविरोधात आंतरराष्ट्रीय करिअरला सुरूवात
30 डिसेंबर 1994 साली ऑकलंडमध्ये जन्मलेल्या काइल जेमिसनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात भारताविरुद्ध झाली. जेमिसनने 2020 च्या भारताच्या दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघात पदार्पण केले. पहिल्या डावात त्याने चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि हनुमा विहारीसह चार विकेट्स घेतल्या, ज्यामुळे न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाजीचे भविष्य सुरक्षित हातात असल्याची चर्चा झाली. त्यानंतर त्याच दौऱ्यावर जेमीसनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्याने 24 चेंडूत दोन विकेट्स घेतल्या आणि नाबाद 25 धावा केल्या आणि सामनावीराचा पुरस्कार जिंकला.
ॲडम मिल्ने ला कशी झाली दुखापत ?
33 वर्षांचा ॲडम मिल्ने हाँ गेल्या रविवारी एमआय केप टाऊन विरुद्ध सनरायझर्स ईस्टर्न कॅपसाठी खेळत होता, तेव्हा पहिल्या ओव्हरमध्येच तो जखमी झाला. त्याने स्पर्धेत 16.27 सरासरीने आणि 7.61 च्या इकॉनॉमी रेटने 11 विकेट्स घेतल्या.