AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi:नाद करतो काय! झिम्बाब्वे दौरा संपतात वैभवला मिळाली मोठी गुड न्यूज, बेबी बॉसचं आता प्रमोशन झालं

वैभव सूर्यवंशी हा नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. वैभव सूर्यवंशीने आपल्या दमदार खेळीच्या जीवावर अनेक रेकॉर्ड मोडून काढले आहे. आता वैभवला एक मोठी संधी देण्यात आली आहे.

Vaibhav Sooryavanshi:नाद करतो काय! झिम्बाब्वे दौरा संपतात वैभवला मिळाली मोठी गुड न्यूज, बेबी बॉसचं आता प्रमोशन झालं
| Updated on: Jul 30, 2026 | 12:16 PM
Share

वैभव सूर्यवंशीने कमी कालावधीत आपल्या खेळाने वेगळीच लोकप्रियता प्राप्त केली आहे, वैभव जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा तो पराक्रम करतोच. वैभवच्या कामगिरीमुळे त्याला कमी कालावधीत अनेक मोठ मोठ्या जबाजदाऱ्या मिळाल्या आहेत. वैभवला पुन्हा एकदा एक मोठी भूमिका मिळाली आहे. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील एक प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफी 2026 साठी पूर्व विभागीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तरुण आणि अनुभवी खेळाडूंनी भरलेल्या या संघाच्या कर्णधारपदी यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनची नियुक्ती करण्यात आली आहे, तर बिहारचा 15 वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. लहान वयातच एवढी मोठी जबाबदारी स्वीकारल्यामुळे, वैभवला आणखी एका भूमिकेत स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल.

इशान किशनची पूर्व विभागीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षी, त्याच्या कर्णधारपदाखाली, त्याने अंतिम सामन्यात हरियाणाला 69 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करून झारखंडला त्यांचे पहिले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी विजेतेपद मिळवून दिले होते. याशिवाय, पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत त्याने आयपीएल 2026 च्या पहिल्या सात सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व केले होते. दुसरीकडे, वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची उपकर्णधारपदी झालेली नियुक्ती हे या संघाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय 19 वर्षांखालील संघाचे नेतृत्व करत मालिका जिंकून दिली होती. तो ही नवीन जबाबदारी कशी सांभाळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार यांचा गोलंदाजी विभागात समावेश करण्यात आला आहे. दोन्ही गोलंदाजांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असून त्यांच्या उपस्थितीमुळे संघाच्या वेगवान गोलंदाजीला बळकटी मिळते. त्यांच्यापैकी शमीच्या कामगिरीकडे बारकाईने लक्ष ठेवले जाईल, कारण काही क्रिकेट तज्ञांच्या मते त्याचा 2027 च्या विश्वचषक संघात समावेश व्हायला हवा. याशिवाय, पूर्व विभागाच्या संघात अभिमन्यू ईश्वरनसारखा अनुभवी फलंदाजही आहे. शहबाज अहमद आणि अनुकूल रॉयसारखे अष्टपैलू खेळाडू संघाला संतुलन प्रदान करतील.

दुलीप ट्रॉफी 2026 साठी पूर्व विभागाचा संघ

इशान किशन (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, सुदीप कुमार घरामी, शाहबाज अहमद, सूरज सिंधू जैस्वाल, मोहम्मद शमी, मुकेश कुमार, कुमार कुशाग्रा, शिखर मोहन, अनुकुल रॉय, विराट सिंग, शुभांशु सेनापती, दानिश सरकार आणि अब्दुल दास.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा