AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: मॅचपूर्वी वैभवने शेअर केली पोस्ट, कॅप्शनची चर्चा, थेट टोमणा मारला?

Vaibhav Sooryavanshi Post: वैभव सूर्यवंशीने एक पोस्ट शेअर केली आहे, उद्या भारत आणि वेस्ट इंडिजचा चौथा टी-२० सामना रंगणार आहे, या सामन्यापूर्वी वैभवने केलेल्या पोस्टची चर्चा होत आहे.

Vaibhav Sooryavanshi: मॅचपूर्वी वैभवने शेअर केली पोस्ट, कॅप्शनची चर्चा, थेट टोमणा मारला?
| Updated on: Oct 13, 2026 | 8:36 AM
Share

Vaibhav Sooryavanshi Post: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण हे झाले आहे, परंतु तो अद्याप भारतात एकही सामना खेळलेला नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत त्याला स्थान मिळेक अशी आशा होती, पण तीन सामन्यात त्याला काही संधी मिळालेली नाही. आता चौथा टी-२० सामना उद्या रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आता वैभव सूर्यवंशीने एक पोस्ट शेअर करत टोमणा मारला आहे.

बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघ मैदानात उतरेल.  वैभव सूर्यवंशीने एक पोस्ट शेअर केली ज्याची आता जोरदार चर्चा सुरु आहे. वैभवने केलेल्या पोस्टमधून हे स्पष्ट समजत आहे की तो टोमणा मारत आहे. तीन सामने त्याला बाहेर बसून ठेवल्यानंतर त्याने ही पोस्ट केल्यामुळे त्याने टोमणा मारला असावा ही शक्यता नाकारताही येत नाही. त्याने सराव करतानाचे फोटो शेअर केले असून त्याने त्यावर “Stay Seated” अशी कॅप्शन दिली आहे. या असा कॅप्शनमुळे त्याने टोमणा मारला असल्याती शक्यता वर्तवली जात आहे.

वैभव सूर्यवंशीने इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. संजू सॅमसनला वगळून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले.  तीन सामन्यांतील त्याच्या खराब कामगिरीनंतर त्याला वगळण्यात आले आणि संजू सॅमसनला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. यानंतर, भारतीय संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला, जिथे सॅमसन संघाचा भाग नव्हता. वैभव तिन्ही सामने खेळला आणि त्याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. यानंतर, भारताने यजमान म्हणून अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळली.

वैभवला कोणत्याही सामन्यात संधी मिळाली नाही. त्यानंतर भारतीय संघ जपानला गेला, जिथे तो एकमेव टी-२० सामना खेळू शकला नाही, परंतु तो २०२६ च्या आशियाई खेळांच्या उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात खेळला. सॅमसनही संघात होता. दरम्यान, जेव्हा भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी मायदेशी परतला, तेव्हा वैभव सूर्यवंशीला वगळण्यात आले. संजू सॅमसनने तीन सामन्यांमध्ये डावाची सुरुवात केली. तो दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरला आणि एका सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. त्यामुळे, सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!