AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Hazare Trophy | 5 सामन्यात 3 शतक आणि 2 अर्धशतक, 18 गगनचुंबी षटकार, कोण आहे ‘हा’ फलंदाज ?

देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) विजय हजारे ट्रॉफीत (Vijay Hazare Trophy) सलग 3 वेळा शतकी कामगिरी केली आहे.

Vijay Hazare Trophy | 5 सामन्यात 3 शतक आणि 2 अर्धशतक, 18 गगनचुंबी षटकार, कोण आहे 'हा' फलंदाज ?
देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) विजय हजारे ट्रॉफीत (Vijay Hazare Trophy) सलग 3 वेळा शतकी कामगिरी केली आहे.
| Updated on: Mar 02, 2021 | 2:04 PM
Share

मुंबई : विजय हजारे करंडकातील (Vijay Hazare Trophy) साखळी फेरीतील खेळ संपला आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाने 5 सामने खेळले आहेत. आता बाद फेरीला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत फलंदाजीच्या बाबतीत देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal)उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळणाऱ्या या 20 वर्षीय बॅटसमनने आतापर्यंत विरोधी संघातील गोलंदाजांना चांगलाच चोपला आहे. सलामीवर देवदत्तने आतापर्यंत या स्पर्धेतील 5 सामन्यांमध्ये 3 शतक आणि 2 हाफ सेंच्युरी लगावल्या आहेत. देवदत्तने साखळी फेरीतील 5 सामन्यात 190.66 च्या एव्हरेजने आणि 97.77 स्ट्राईक रेटने 572 धावा केल्या आहेत. यात 18 सिक्सचाही समावेश आहे. 152 ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या राहिली आहे. (vijay hazare trophy karnataka devdutt padikkal consecutive 3 century in 5 match in league round)

टॉप 5 बॅट्समन

देवदत्त नंतर हैदराबादच्या तन्मय अग्रवालचा सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसरा क्रमांक आहे. त्याने 5 सामन्यात 89.20 च्या सरासरीने 2 शतक आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 446 धावा केल्या आहेत. 150 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. कर्नाटकचा रवीकुमार समर्थ 5 मॅचमध्ये 413 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 137.66 च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. त्याने 2 शतक आणि 2 अर्धशतक झळकावले आहेत. नाबाद 158 ही त्याची हायेस्ट धावसंख्या आहे. यानंतर चौथ्या क्रमांकावर मुंबईकर पृथ्वी शॉ येतो. पृथ्वीने 5 मॅचमध्ये 134.66 च्या एव्हरेजने दो शतकासंह 404 रन्स चोपल्या आहेत. नाबाद 227 ही शॉची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर पाचव्या नंबरवर हैदराबादचा तिलक वर्मा आहे, तिलकने 97.75 च्या सरासरीने 2 सेंच्युरी आणि 1 अर्धशतकासह 391 धावा बनवल्या आहेत.

देवदत्तची शानदार सुरुवात

देवदत्‍तने 20 फेब्रुवारीला या स्पर्धेत पहिला सामना उत्तर प्रदेश विरुद्ध खेळला. या सामन्यात त्याने 84 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. या सामन्यात पावसाचा अडथळा आला होता. यामुळे कर्नाटकाला 9 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरा सामना 22 फेब्रुवारीला बंगळुरु विरुद्ध खेळवण्यात आला. यामध्ये देवदत्‍तने 98 बोलमध्ये 8 चौकार आण 2 सिक्ससह 97 धावा केल्या. तिसरा सामना ओडिसा विरुद्ध 24 फेब्रुवारीला खेळवला गेला. या सामन्यात त्याने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. देवदत्तने या सामन्यामध्ये 140 बोलमध्ये 14 चौकार आणि 5 सिक्ससह 152 धावांची दीडशतकी खेळी केली. या सामन्यात कर्नाटकने 101 धावांनी विजय मिळवला.

शतकी हॅटट्रिक

26 फेब्रुवारीला साखळी फेरीत कर्नाटकाची गाठ केरळ विरुद्ध पडली. या मॅचमध्ये देवदत्तने 126 धावांची खेळी केली. यामुळे कर्नाटकाचा 9 विकेट्सने विजय झाला. देवदत्तने 138 चेंडूत 13 फोर आणि 2 सिक्ससह 126 धावा केल्या. कर्नाटकाने साखळी फेरीतील 5 वा आणि शेवटचा सामना रेल्वे विरुद्ध खेळला. यात कर्नाटकाने रेल्वेवर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. देवदत्तने 125 चेंडूत 9 चौकार आणि 9 सिक्ससह नाबाद 145 धावा केल्या.

देवदत्तची आयपीएल कारकिर्द

देवदत्तने आयपीएलच्या 13 व्या मोसमात 14 सामने खेळला. यामध्ये त्याने 126.54 च्या स्ट्राईक रेटने तसेच 33.71 च्या सरासरीने 472 धावा केल्या. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. देवदत्तची 74 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

संबंधित बातम्या :

Vijay Hazare Trophy | षटकारांचा पाऊस, शतकांची हॅटट्रिक, कोहलीच्या टीममधील देवदत्तची तडाखेदार बॅटिंग

IPL 2020, DCvs RCB : देवदत्त पडीक्कलची विक्रमी कामगिरी

Vijay Hazare Trophy | श्रीसंतची आक्रमक गोलंदाजी, रॉबिन उथप्पाची वादळी खेळी, केरळाचा बिहारवर 9 विकेट्सने शानदार विजय

(vijay hazare trophy karnataka devdutt padikkal consecutive 3 century in 5 match in league round)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.