Vijay Hazare Trophy: सामन्यात सलग 3 शतके, तरीही हा फलंदाज टीम इंडियापासून का दूर आहे ?

महेश घोलप, Tv9 मराठी

Updated on: Dec 03, 2022 | 10:01 AM

तीनवेळा शतकी पारी, निवड समितीचं दुर्लक्ष, टीम इंडियामध्ये या खेळाडूला संधी मिळणार का ?

Vijay Hazare Trophy: सामन्यात सलग 3 शतके, तरीही हा फलंदाज टीम इंडियापासून का दूर आहे ?
Ruturaj-Gaikwad
Image Credit source: instagram

मुंबई : विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) अशी पारी खेळली आहे की, निवड समितीला त्याला पुढच्या होणाऱ्यासाठी टाळू शकत नाही. सलग तीनवेळा शतकी पारी खेळल्यानंतर गायकवाड अधिक चर्चेत आहे. सोशल मीडियावर (Social Media) अनेकांनी त्याचं स्वागत केलं आहे. त्याचबरोबर त्याला टीम इंडियामध्ये कधी संधी मिळणार असा चाहत्यांनी प्रश्न केला आहे. आयपीएलमध्ये सुद्धा गायकवाडने अनेकदा चांगली खेळी केली आहे.

टीम इंडियाचा नुकताच न्यूझिलंड दौरा झाला. उद्यापासून बांगलादेश दौरा सुरु होणार आहे. टीम इंडियामध्ये अद्याप चांगल्या गोलंदाजांची कमतरता असल्याचं अनेकदा जाणवलं आहे. विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेत सुद्धा महत्त्वाच्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेट घेता आली नाही. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला.

न्यूझिलंड दौऱ्यात सुध्दा टीम इंडियाच्या गोलंदाजांची चांगली धुलाई झाली. त्यामुळे टीम इंडियाने एकदिवसीय मालिका गमावली. टीम इंडियामध्ये पुढच्या काही दिवसात बदल पाहायला मिळणार असल्याचं सुचकं वक्तव्य बीसीसीआयनं केलं आहे.

ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जसाठी आतापर्यंत चांगली खेळी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे अधिक फॉलोअर्स आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात गायकवाड अजून तरी ओपनिंगची संधी देण्यात येते.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI