AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटबाबत छेडछाड का? आयसीसीच्या प्रस्तावाला विराटचा विरोध

आयसीसीने कसोटी सामन्याबाबत सादर केलेल्या प्रस्तावाला विराटने विरोध केला आहे.

क्रिकेटबाबत छेडछाड का? आयसीसीच्या प्रस्तावाला विराटचा विरोध
| Updated on: Jan 04, 2020 | 7:19 PM
Share

गुवाहाटी : आयसीसी पुढील काही वर्षांमध्ये चार दिवसांचा कसोटी सामना (bcci proposal of four day test match) सुरु करण्याचा विचार करत आहे. मात्र, आयसीसीच्या या प्रस्तावाला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने विरोध केला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी गुवाहाटी येथे टी 20 मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवरच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याच पत्रकार परिषदेत आयसीसीच्या प्रस्तावासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर विराटने प्रतिक्रिया दिली (bcci proposal of four day test match) .

नियमांनुसार टेस्ट सामना हा पाच दिवस चालतो. मात्र, व्यावसायिक दृष्टीकोनातून विचार करता आयसीसी 2023 ते 2031 दरम्यानचे पुढील आंतरराराष्ट्रीय कसोटी सामने चार दिवसांचा आखण्याचा विचार करत आहे. मात्र, या प्रस्तावाला विराट कोहलीने विरोध केला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून या प्रस्तावाचे समर्थन केले जात आहे.

भारतीय संघाचा बांगलादेशसोबत नुकताच डे-नाईट कसोटी सामना खेळला गेला. दरम्यान याबाबत विराट कोहलीला प्रश्न विचारला असता तो म्हणाला, डे-नाईट कसोटी सामना हे क्रिकेटचे व्यावसायिकीकरणच्या पार्श्वभूमीवर पुढचे पाऊल आहे. मात्र, यापेक्षा जास्त छेडछाड केली जाऊ नये. हा एक पारंपरिक खेळ आहे. त्यामुळे कसोटी सामन्यात डे-नाईट पर्यंतचा बदलच भरपूर झाला.

‘पाच दिवसांचा कसोटी सामना तुम्ही चार दिवसांचा व्हावा, असे म्हणत आहात. काही दिवसांनी हाच कसोटी सामना तीन दिवसांचा व्हावा, अशी मागणी केली जाईल. हळूहळू कसोटी सामन्यांचा आणखी वेळ कमी होईल. त्यानंतर तुम्ही म्हणाल की, कसोटी सामना काळाच्या पळद्याआड गेला’, असे विराट म्हणाला.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.