AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | सूर्यकुमार यादवची अफलातून अर्धशतकी खेळी, कर्णधार विराटकडून कौतुक, म्हणाला….

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात 57 धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या या खेळीचं कौतुक केलं.

Video | सूर्यकुमार यादवची अफलातून अर्धशतकी खेळी, कर्णधार विराटकडून कौतुक, म्हणाला....
सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात 57 धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या या खेळीचं कौतुक केलं.
| Updated on: Mar 19, 2021 | 4:35 PM
Share

अहमदाबाद : “सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) इशान किशनप्रमाणेच आपल्या पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी केली. हे दोघेही आयपीएलमध्ये निडरपणे खेळतात. पहिल्याच सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणं आव्हानात्मक असतं. सूर्याने तिसऱ्या क्रमांकावर चांगली खेळी केली. आम्ही पाहून दंग राहिलो”, अशा शब्दात विराट कोहलीने (Virat Kohli) सूर्यकुमार यादवंच कौतुक केलं. इंग्लंडला चौथ्या सामन्यात पराभूत केल्यानंतर (India vs England 4th t20i) विराट बोलत होता. यावेळेस त्याने सूर्याचं कौतुक केलं. (virat kohli praised suryakumar yadav for his 57 scored innings)

हार्दिक पांड्याचं कौतुक

“हार्दिक पांड्या आणि रिषभ पंतने आपली भूमिका चोखपणे पार पाडली. मी या युवा खेळाडूंचा चाहता आहे. मी हार्दिकसाठी फार आनंदी आहे. कारण त्याने 4 ओव्हर बोलिंग केली. हार्दिकचं बोलिंग करणं हे आमच्यासाठी चांगले संकेत आहेत. हार्दिककडे गोलंदाजीसोबत चांगले स्किल आहे. त्याने 140 पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी केली. त्याने जेसन रॉयला आपल्या बोलिंगने बांधून ठेवलं. तसंच सॅम करनला बाद केलं”, असं म्हणत विराटने हार्दिकवर कौतुकाचा वर्षाव केला.

सूर्यकुमारची अर्धशतकी खेळी

सूर्यकुमार यादवने तिसऱ्या क्रमांकावर अफलातून फलंदाजी केली. सूर्यकुमारने आपल्या पहिल्याच डावाचा श्रीगणेशा सिक्सर खेचत केला. त्याने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर सिक्स खेचला. सूर्याने या सामन्यात दणदणीत अर्धशतक झळकावलं. सूर्याने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. मात्र पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे सूर्याला मैदानाबाहेर जावे लागले. सूर्याने 31 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 57 धावांची अफलातून खेळी केली. त्याच्या या खेळीसाठी त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

मालिकेत 2-2 ने बरोबरी

टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली आहे. यामुळे मालिकेच्या दृष्टीने 5 वा सामना हा रंगतदार होणार आहे. हा 5 वा सामना 20 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

एकदिवसीय मालिकेतही संधी

दरम्यान उभय संघात टी 20 मालिकेनंतर वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या मालिकेतही सूर्यकुमारला संधी मिळाली आहे. यामुळे सूर्या एकदिवसीय मालिकेत कशी कामगिरी करतो, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारण्याची हिंमत कुठून आली, शार्दुलच्या प्रश्नावर सूर्यकुमार काय म्हणाला?

6 बोल 23 रन्स, शार्दूलच्या हाती बोल, 2 वाईड, भारताची धडधड आणि रोहित शर्माची एन्ट्री, नेमकं काय घडलं?

(virat kohli praised suryakumar yadav for his 57 scored innings)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.