Virat Kohli-MS Dhoni: रांचीत दिसला विराट-धोनीचा दोस्ताना, कॅप्टन कूलच्या घरी पोहोचला कोहली, Video व्हायरल

टीम इंडियाचे दोन माजी कर्णधार आणि खास मित्र यांना पन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांना IPLच्या पुढल्या सीझनची वाट पहावी लाते. मात्र आता IPL पूर्वीच क्रिकेट चाहत्यांना विराट कोहली आणि एमएस धोनी यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची संधी मिळाली. तो व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला.

Virat Kohli-MS Dhoni: रांचीत दिसला विराट-धोनीचा दोस्ताना, कॅप्टन कूलच्या घरी पोहोचला कोहली, Video व्हायरल
विराट कोहली- एमएस धोनी
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Nov 28, 2025 | 8:48 AM

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवातून सावरणे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय कठीण आहे. घरच्या मैदानावर क्लीन स्वीप मिळाल्याच्या अपमानामुळे चाहत्यांचे मन दुखावलं गेलंय. मात्र याच वेळी क्रिकेट चाहत्यांनाएक असंही दृश्य दिसलं, ज्यामुळे पराभवाच्या दु:खातून सावरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडं हसू फुललं. आणि त्या आनंदामागचं कारण म्हणजे टीम इंडियाचे दोन माजी कर्णधार , एमएस धोनी ( MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) . रांचीमधील वनडे मॅचपूर्वी धोनीने कोहलीला, त्याच्या घरी डिनरसाठी आमंत्रण दिलं, कोहलीही त्याचं आमंत्रण स्वीकारत घरी गेला. त्यानंतर परत जाताना खुद्द धोनीनेच कार चालवत विराटला त्याच्या इच्छित स्थळी पोहोचवलं. या दोघांच्या व्हिडीओही समोर आला असून तो प्रचंड व्हायरल झाला आहे.

वनडे मॅचपूर्वी कोहली पोहोचला धोनीच्या भेटीला

सोशल मीडियावर काल (27 नोव्हेंबर) रात्री अचानक ‘माहीराट’ (माही+विराट) ट्रे़डिंगमध्ये होतेय. धोनी आणि विराट कोहली यांना एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांना अनेकदा आयपीएलपर्यंत वाट पहावी लागते, परंतु यावेळी, आयपीएलचा नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वीच, चाहत्यांना भारतीय क्रिकेटमधील दोन्ही दिग्गज कर्णधार आणि खास मित्रांना एकत्र पाहण्याची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळण्यासाठी रांचीला आलेल्या विराटला धोनीने त्याच्या फार्महाऊसवर आमंत्रित केले होते. एवढंच नव्हे तर त्यासाठी त्याने त्याची खास एसयूव्ही रेंज रोव्हर देखील पाठवली.

 

कोहलीला सोडण्यासाठी खुद्द गेला धोनी

त्यानंतर विराट कोहली हा धोनीच्या घराजवळ पोहोचताच चाहत्यांची आणि माध्यमांची गर्दी जमली आणि सर्वांनी त्याचे फोटो, व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. पाहता पाहात ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. पण सर्वात विशेष दृश्य थोड्या वेळाने दिसले, जेव्हा भेट संपवून कोहली हॉटेलमध्ये परत जाण्यासाठी निघाला. ते दृश्य खास होतं कारण खुद्द एमएस धोनी हाच विराटला ड्रॉप करण्यासाठी गेला. धोनीने त्याची रेंज रोव्हर कार काढली, ती तोच चालवत होता आणि विराट त्याच्या शेजारच्याच सीटवर बसला होता.

 

मग काय ते दृश् पाहून चाहते खुश झाले, त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी, त्यांचे फोटो, व्हिडीओ टुपण्यासाठी झुंबड उडाली. अनेकांच्या तोंडी फक्त ‘माहीराट’ (MahiRat) यांचं नावं, त्यांची मैत्री याचे किस्से झळकू लागले. विशेष म्हणजे टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतही या खास डिनरसाठी धोनीच्या घरी पोहोचला होता आणि त्याला पाहण्यासाठी देखील चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती.