
भारतीय संघात आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे प्रसिद्ध असलेला, शानदार फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हा सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी आरती व सेहवाग यांच्यात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा काही काळापासून सुरू होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या घटस्फोटाबद्दलही अफवा उडाल्या होत्या. त्यानंतर अशीही बातमी समोर आली की सेहवागच्या मित्राशी आरतीचं अफेर आहे. यावर त्या दोघांपैकी कोणीच काही बोललं नव्हतं. मात्र आता दिवाळीनिमित्त सेहवागने शेअर केलेल्या फोटोमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरील हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
खरंतर, वीरेंद्र सेहवागने 20 ऑक्टोबर रोजी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो टाकला. घरी केलेल्या सेलिब्रेशनचे फोटो टाकत त्याने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यासोबत संस्कृतमध्ये एक श्लोकही होता – दीपज्योतिः परं ब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः । दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥ #happydeepavali असं त्याने लिहीलं.
त्या फोटोंमध्ये वीरेंद्र सेहवाग हा त्याची आई तसेच आर्यवीर आणि वेदांत या दोन मुलांसह, दिसत आहे, परंतु त्याची पत्नी आरती त्या फोटोत कुठेच नाही. ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि लोकांनी विविध प्रश्न विचारण्यास सुरूवात केली.
घटस्फोट झाला का ?
या फोटोवर लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या. पण काही लोकांनी सेहवागला थेट सवाल विचारले. तुमची पत्नी कुठे आहे ? असं एका यूजरने विचारलं तर अनेकांनी त्याला थेट घटस्फोटाबद्दलच विचारलं. घटस्फोट झाला का ? असा सवालही लोकांनी उपस्थित केला. एवढंच नव्हे तर एकाने लिहीलं – पत्नीशिवाय दिवाळी सण कसा वाटेल ? मुलांची आई सोबत दिसली असती तर चांगलं वाटलं असतं अशी कमेंट आणखी एकाने केली.
घटस्फोटाच्या बातम्या, वाद यावर वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांनी अद्याप काहीच भाष्य केले नाही की या अफवांचे खंडन केले नाही. सेहवाग आणि आरती हे दूरचे चुलत भाऊ-बहीण आहेत. कौटुंबिक लग्नात भेट झाल्यावर, त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. वयाच्या 21 व्या वर्षी वीरूने आरतीला प्रपोज केले आणि तीन वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी 22 एप्रिल 2004 साली लग्न केले. दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी कडक सुरक्षा व्यवस्था असताना हा विवाहसोहळा पार पडला. त्यांचा मुलगा आर्यवीरचा जन्म 2007 साली तर आणि वेदांतचा जन्म 2010 मध्ये झाला. आता, दिवाळी पोस्टमुळे हे जोडपे वेगळे झाल्याच्या अफवांना खतपाणी मिळत आहे.