Rishabh Pant: ऋषभ पंतच्या अपघातप्रकरणी नवी अपडेट; NHAI अधिकाऱ्याने केला मोठा खुलासा

ऋषभ पंतचा अपघात खड्ड्यामुळे? अपघातासंदर्भात आता NHAI अधिकाऱ्याने दिली महत्त्वपूर्ण माहिती

Rishabh Pant: ऋषभ पंतच्या अपघातप्रकरणी नवी अपडेट; NHAI अधिकाऱ्याने केला मोठा खुलासा
Rishabh PantImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 10:27 AM

हरिद्वार: कार अपघातात गंभीर जखमी झालेला क्रिकेटर ऋषभ पंत याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. सोमवारी त्याला आयसीयू विभागातून बाहेर हलवण्यात आलं. कार अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर पंतला शुक्रवारी देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रस्त्यावरील खड्डा चुकवताना ऋषभचा कारवरील ताबा सुटला आणि अपघात घडला, असं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी रविवारी रुग्णालयात पंतची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. यावर आता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या (NHAI) एका अधिकाऱ्याने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

NHAI अधिकारी प्रदीप सिंह गुसाईं म्हणाले, “ज्या ठिकाणी ऋषभ पंतचा अपघात झाला, तिथे कोणताच खड्डा नव्हता. पंतची कार जिथे रेलिंगला धडकली, तिथं हायवेला लागूनच कालवा (रजवाहा) असल्याने तो रस्ता अरुंद आहे. सिंचनासाठी तो कालवा वापरला जातो.”

NHAI ने दुर्घटनास्थळावरील खड्डे बुजवल्याच्या चर्चांनाही गुसाईं यांनी फेटाळलं. रविवारी संध्याकाळी या हायवेच्या दुरुस्तीचं काम करणाऱ्या कामगारांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हे सुद्धा वाचा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी मॅक्स रुग्णालयात पंतची भेट घेतली होती. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की “रस्त्यावरील खड्डा किंवा काहीतरी काळसर दिसणारी गोष्ट चुकवताना कारचा ताबा सुटला असं ऋषभने सांगितलं.” दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) संचालक श्याम शर्मा यांनीही पंतची रुग्णालयात भेट घेतली होती. त्यांनीसुद्धा माध्यमांशी बोलताना खड्ड्याचा उल्लेख केला होता.

ऋषभ पंतच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा

“ऋषभची प्रकृती एकदम चांगली आहे. त्याच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा दिसल्यामुळे रविवारी रात्रीच त्याला आयसीयू विभागातून बाहेर हलविण्यात आलं. मात्र ऋषभच्या पायाला होणाऱ्या वेदना अजूनही कायम आहेत. त्याची एमआरआय चाचणी करण्याचा अद्याप विचार नाही”, अशी माहिती ऋषभवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

Non Stop LIVE Update
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.