AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar : वैभव सूर्यवंशी ग्रेट का? सचिनने जे विश्लेषण केलं, त्याच्या नजरेने जे हेरलं त्याला तोड नाही VIDEO

Sachin Tendulkar : वैभव सूर्यवंशीच्या खेळाबद्दल प्रथमच सचिन तेंडुलकर बोलला आहे. सचिन स्वत: ग्रेट क्रिकेटपटू आहे. त्यामुळे वैभवच्या खेळातली अचूकता त्याच्या नजरेने नेमकी हेरली व त्या बद्दल सचिन बोलला. वैभव सूर्यवंशीचं कौतुक सगळेच करतात. पण सचिन तेंडुलकरने जे विश्लेषण केलं त्याला तोड नाही.

Sachin Tendulkar : वैभव सूर्यवंशी ग्रेट का? सचिनने जे विश्लेषण केलं, त्याच्या नजरेने जे हेरलं त्याला तोड नाही VIDEO
Sachin Tendulkar-Vaibhav sooryavanshi Image Credit source: PTI
| Updated on: Jun 01, 2026 | 12:06 PM
Share

आयपीएल 2026 च्या सीजनची काल सांगता झाली. फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सवर 5 विकेट राखून विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली. फायनलमध्ये विराट कोहलीने दमदार खेळ दाखवला. RCB चे बॉलर्स आणि विराटची फलंदाजी या बळावर बंगळुरुने दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. फायनलमध्ये विराट कोहलीने शानदार नाबाद 75 धावंची खेळी केली. फायनल RCB ने जिंकली. पण त्यापेक्षा जास्त चर्चा आहे ती वैभव सूर्यवंशीची. राजस्थान रॉयल्सच्या या युवा ओपनरने यंदाचा सीजन गाजवला. 15 वर्षाच्या या मुलाने भल्या-भल्या गोलंदाजांची वाट लावली. त्यांची गोलंदाजी फोडून काढली. वैभव सूर्यवंशीला काल टुर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. ऑरेंज कॅपचा पुरस्कार जिंकणारा तो पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला.

वैभवला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन, इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन, सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन आणि मोस्ट सिक्सर्स हे पुरस्कारही मिळाले. सोशल मीडियापासून सगळीकडे सध्या वैभव सूर्यवंशीची चर्चा आहे. जसप्रीत बुमराह सारख्या टॉप बॉलरला त्याने पहिल्या चेंडूवर सिक्स मारला. टीम इंडियाच्या आणि परदेशातील दर्जेदार गोलंदाजांवर त्याने हल्ला चढवला. वैभव सूर्यवंशीचं टॅलेंट पाहून त्याच्यासाठी लवकरात लवकर टीम इंडियाचे दरवाजे उघडले गेले पाहिजेत अशी मागणी जोर धरु लागली आहे. वैभवला सिनियर टीम इंडियात कधी संधी मिळणार? ती येणारी वेळच ठरवेल.

त्याच्यातलं वेगळेपण अत्यंत अचूकतेने हेरलं ते सचिन तेंडुलकरने

पण वैभव सूर्यवंशी इतरांपेक्षा उजवा का आहे? त्याच्यात एवढं टॅलेंट कसं? त्याचं अचूक विश्लेषण क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने केलं आहे. सगळेच वैभव सूर्यवंशीचं कौतुक करतायत, पण त्याच्यातलं वेगळेपण अत्यंत अचूकतेने हेरलं ते सचिन तेंडुलकरने. सचिन तेंडुलकरने वैभव सूर्यवंशीच्या खेळाचं जे विश्लेषण केलं, त्याला तोड नाहीय.

वैभव सूर्यवंशीबद्दल सचिन तेंडुलकरचं विश्लेषण काय?

“सगळे वैभव सूर्यवंशीबद्दल बोलतायत. मी त्याची फलंदाजी पाहिली. खूप सुंदर बॅटिंग करतो. त्याच्यात काहीतरी खास आहे. पण मी जे पाहिलं, त्यानुसार तो फक्त चेंडू मारत नाही. तो उत्तमरित्या मनगटाचा वापर करतो. सर्वबाजूंना फटकेबाजी करण्यासाठी मनगटाचा कौशल्याने वापर करता आला पाहिजे. तो फक्त हिटिंग करत नाही, तर दुसऱ्या फलंदाजांच्या तुलनेत तो चेंडूचा दिशा आणि टप्पा आधी ओळखतो. त्यामुळे त्याला चेंडू सीमारेषेपार पोहोचवणं सहज जमतं” असं सचिन तेंडुलकर म्हणाला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...