Virat kohli : लेक वामिकाचा चेहरा कधी दाखवणार? फॅन्सच्या प्रश्नावर ‘विराट स्टाईल’ उत्तर!

Virat kohli : लेक वामिकाचा चेहरा कधी दाखवणार? फॅन्सच्या प्रश्नावर 'विराट स्टाईल' उत्तर!
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

एका फॅन्सने विराटला खास प्रश्न विचारला ज्या उत्तराची सगळी जग वाट पाहत होतं. विराटने देखील त्याच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. | Virat Vamika

Akshay Adhav

|

May 30, 2021 | 9:04 AM

मुंबई : कसोटी क्रिकेटचा ‘वर्ल्ड कप’ मानला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final 2021) 18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टन (Southampton) येथे खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन तुल्यबळ संघांदरम्यान हा सामना पार पडेल. तर भारताला याच दौऱ्यात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळायची आहे. भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला जाण्यासाठी टेकऑफ करेल. त्याअगोदर संपूर्ण टीम मुंबईत क्वारन्टाईन आहे. याचदरम्यान कर्णधार विराट कोहलीला (Virat kohli) चाहत्याने इन्स्टाग्रामवरुन तू तुझी लेक वामिकाचा (Vamika) चेहरा सगळ्यांना कधी दाखवणार आहेस? असा प्रश्न केला. त्यावर विराटने खास ‘विराट स्टाईल’ उत्तर दिलं. (When Virat Anushka Will Show face of daughter Vamika Fan Asked  Question)

विराटसह संपूर्ण संघ मुंबईत क्वारंटाईन

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि संघातील सहकारी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. यादरम्यान आपल्या फॅन्सशी ऑलनाईन गप्पागोष्टी करण्याचा विराटचा मूड झाला. त्याने इन्स्टाग्रामवरुन तशी सूचना आपल्या चाहत्यांना दिली. साहजिकच चाहत्यांना हेच हवं होतं…. !

फॅन्सने विचारलं वामिका चेहरा कधी दाखवणार?

एका फॅन्सने विराटला खास प्रश्न विचारला ज्या उत्तराची सगळी जग वाट पाहत होतं. तुझ्या लेकीच्या नावाचा अर्थ काय आहे? ती आता कशी आहे? तिची एक झलक आम्हाला दाखवू शकशील का? असे एकापाठोपाठ एक तीन प्रश्न एका फॅन्सने विराटला विचारले.

चाहत्याच्या प्रश्नाला विराट स्टाईल उत्तरं!

विराटने चाहत्याला प्रश्नाला अगदी दिलखुलास उत्तरं दिली. वामिका हे देवी दुर्गाचं दुसरं नाव आहे. आम्ही नवरा बायकोने ठरवलंय (विराट-अनुष्का) की आपल्या लेकीचा फोटो आपण सोशल मीडियावर टाकायचा नाही. जोपर्यंत तिला सोशल मीडिया म्हणजे काय? हे समजत नाही तोपर्यंत तिचा चेहरा, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचा नाही. यासंदर्भात ती (वामिका) तिचा निर्णय घेईन, अशी विराट स्टाईल उत्तरं चाहत्याला मिळाली.

Virat reply Fans Over Vamika Question

चाहत्याच्या प्रश्नाला विराटचं उत्तर

(When Virat Anushka Will Show face of daughter Vamika Fan Asked Question)

हे ही वाचा :

WTC फायनल खेळायचीय, भारतीय संघाला ICC चे कडक नियम पाळावेच लागतील!

तुझं आणि माहीचं नातं फक्त 2 शब्दात सांग, फॅन्सच्या प्रश्नावर विराटचं ‘हृदय’ जिंकणारं उत्तर!

Video : IPL मॅचेससाठी चहलची बायको युएईला जाण्यासाठी तयार, BCCI ने घोषणा करताच डान्सचा खास व्हिडीओ शेअर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें