Neeraj Chopra Wife : ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राचा विवाह, पत्नी हिमानी कोण आहे? काय करते? जाणून घ्या
Neeraj Chopra Wife : संपूर्ण देशाला नीरज चोप्राच्या लग्नाची प्रतिक्षा होती. नीरज चोप्रा कधी आणि कोणाशी लग्न करणार? हे सर्वांनाच जाणून घ्यायच होतं. नीरजने हिमानी मोर सोबत लग्न केलय. आता सगळ्यांचा एकच प्रश्न आहे, नीरजच मन जिंकणारी हिमानी मोर कोण आहे? काय करते?

भारताचा सुपरस्टार जॅवलिन थ्रोअर नीरज चोप्राने वर्ष 2025 च्या पहिल्या महिन्यात सगळ्या देशाचा आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. ऑलिम्पिक सुवर्ण आणि रौप्यपदक विजेत्या नीरज चोप्राने लग्न केलय. दिग्गज एथलिटने कोणाला कानोकान खबर लागू न देता कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाह केला. नीरजने शनिवारी 19 जानेवारीला सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या जगाला याची माहिती दिली. नीरजने जिच्यासोबत लग्न केलं, तिच नाव हिमानी आहे. पण ही हिमानी कोण आहे? जिने नीरजच मन जिंकलं?. हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. ही हिमानी एक टेनिस कोच आहे. ती हरियाणाची राहणारी आहे.
नीरज चोप्रा कुठल्या मुलीबरोबर? कधी लग्न करणार? हे प्रत्येकाला जाणून घ्यायच होतं. नीरजने फॅन्ससोबत लग्नाची बातमी शेअर करताना फक्त पत्नी हिमानीच नाव सांगितलं. पण ही हिमानी कोण आहे? हे फॅन्स जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. खरंतर हिमानीच पूर्ण नाव हिमानी मोर आहे. ती नीरजप्रमाणे हरियाणाची राहणारी आहे. नीरज हरियाणाच्या पानीपत जिल्ह्यातील खंडरा गावचा राहणारा आहे. हिमानी सोनीपत जिल्ह्यातील लडसौली गावाशी संबंधित आहे.
कुठल्या देशात शिक्षण?
स्पोर्टस्टारच्या रिपोर्टनुसार, 25 वर्षाच्या हिमानी मोरने सोनीपतच्या शाळेतून सुरुवातीच शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्ली युनिवर्सिटीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्स आणि फिजिकल एजुकेशनमधून ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर तिने अमेरिकेच्या लुइसियाना राज्यातील साऊथईस्टर्न लुइसियाना यूनिवर्सिटीमधून शिक्षण घेतलं. तिने फक्त अमेरिकेत शिक्षणच घेतलं नाही, तर तिथे टेनिसही खेळायची. सोबतच टेनिस कोचिंगही सुरु केली.
कुठल्या खेळात पारंगत?
अमेरिकेच्या न्यू हॅम्पेशरमध्ये फ्रँकलिन पियर्स यूनिवर्सिटीमध्ये वॉलंटियर टेनिस कोच म्हणूनही काम केलय. सध्या ती अमेरिकेतीलच मॅसाचुसेट्स राज्यातील एमहर्स्ट कॉलेजमध्ये ग्रॅजुएट असिस्टेंट आहे. कॉलेजच्या महिला टेनिस टीमला कोचिंग देते. सोबतच मॅक्कॉरमॅक आइजनबर्ग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये स्पोर्ट्स मॅनेजमेंटच शिक्षण घेत आहे.
सातत्याने पदक विजेती कामगिरी
नीरज चोप्रा भारताचा स्टार जॅवलिन थ्रोअर आहे. मागच्या सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने पदकविजेती कामगिरी केली आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेती कामगिरी केली आहे. त्याशिवाय विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने भारतासाठी पदकं जिंकली आहेत.