AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का नाहीत?

मुंबई: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. दादरमधील  शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. जावयाने आचरेकर सरांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. पद्मश्री पुरस्कारप्राप्त आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणं अपेक्षित होतं, मात्र सरकारने ते केले नाहीत. त्यामुळे सरकारवर क्रीडाप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सरकारची बाजू मांडताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता […]

आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का नाहीत?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM
Share

मुंबई: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. दादरमधील  शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. जावयाने आचरेकर सरांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. पद्मश्री पुरस्कारप्राप्त आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणं अपेक्षित होतं, मात्र सरकारने ते केले नाहीत. त्यामुळे सरकारवर क्रीडाप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सरकारची बाजू मांडताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिलगिरी व्यक्त केली.

क्रीडा मंत्री विनोद तावडेंचं स्पष्टीकरण

‘शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी काही प्रोटोकाॅल असतात, तो प्रोटोकाॅल मोडता येत नाही, पण आचरेकर सरांच्या स्मृती प्रित्यर्थ काही उपक्रम राज्य सरकार नक्की सुरु करणार’ असं क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी नागपुरात स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी आचरेकर सरांना आदरांजली सुद्धा वाहिली. सरकारचे प्रतिनिधी आचरेकर सरांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते, असंही ते म्हणाले.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नाहीत

रमाकांत आचरेकर सरांवर अंत्यसंस्कार शासकीय इतमामात न झाल्याने, क्रिकेट चाहत्यांनी राज्य सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का नाहीत? असे प्रश्न उपस्थितांनी विचारले. यावेळी राज्य क्रीडा अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र वाहिले. याबद्दल राज्य क्रीडा उपसंचालकांना विचारले असता, त्यांनी हा प्रोटोकॉल सामान्य प्रशासन विभागाचा असल्याचं सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

सचिनकडून अंत्यविधी, जावयाकडून मुखाग्नी

दरम्यान, अंतिमविधी आचरेकरांचा शिष्य सचिनने पूर्ण केले. तर जावयाने मुखाग्नी दिला.

अंत्ययात्रेला दिग्गजांची हजेरी

आचरेकर सरांच्या अंत्यदर्शनासाठी खुद्द सचिन तेंडुलकर तर उपस्थित होताच, शिवाय विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही अंत्यदर्शनाला गर्दी केली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, भाजप आमदार आशिष शेलार यांचा समावेश होता. रमाकांत आचरेकर यांचं पार्थिव ज्या गाडीतून नेण्यात आलं, त्या गाडीत स्वत: सचिन तेंडुलकर उभा होता. अंत्ययात्रेच्या सुरुवातीपासून सचिन आचरेकरसरांच्या पार्थिवाजवळच होता.

आचरेकर सरांंचं पार्थिव शिवाजी पार्कातील मैदान आणताच सचिन तेंडुलकर ढसाढसा रडला. याच शिवाजी पार्काच्या मैदानातील माती, आचरेकर सरांच्या पार्थिवार ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर 2 मिनिटं मौन पाळलं.

सर्व शिष्यांनी खांदा दिला

यावेळी आचरेकर सरांच्या सर्व शिष्यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, किरण मोरे यांच्यासह अनेकांनी सरांच्या पार्थिवाला खांदा दिला.

आचरेकर सर कालवश

क्रिकेट जगताला देव देणारे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं बुधवारी 2 जानेवारी रोजी निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. रमाकांत आचरेकर सरांच्या तालमीत सचिन तेंडुलकरसह अनेक हिरे घडले. यामध्ये विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. आचरेकर सरांच्या निधनाने क्रिकेट विश्वातील द्रोणाचार्य हरपल्याची भावना आहे.

रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा जन्म मालवणमध्ये 1932 मध्ये झाला. दादरमधील शिवाजी पार्कात त्यांनी क्रिकेटमधील दिग्गजांना धडे दिले. पुढे याच खेळाडूंनी भारतीय संघात प्रवेश करुन जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला.

संबंधित बातम्या 

सरांचं पार्थिव शिवाजी पार्कात येताच सचिन ढसाढसा रडला

Follow Us
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...