T20 WC Final : इंग्लंडच्या टीममध्ये होणार बदल, या खेळाडूंना मिळणार संधी
फायनल जिंकण्यासाठी इंग्लंड करणार टीममध्ये बदल ? या खेळाडूंना टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : विश्वचषक स्पर्धेतील (T20 WC) उद्या फायनलची मॅच मेलबर्नमध्ये येथे होणार आहे. दुपारी दीडवाजल्यापासून चाहत्यांना क्रिकेटच्या मॅचचा (Cricket Match) आनंद घेता येणार आहे. उद्याच्या मॅचसाठी मेलबर्नच्या मैदानात दोन्ही टीमचे खेळाडू सराव करीत आहे. महत्त्वाचा सामना असल्यामुळे इंग्लंडच्या (ENG) टीममध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या प्रशिक्षकांनी दिली आहे.
टीम इंडियाचा पराभव इंग्लंड टीमने केल्यानंतर इंग्लंड टीम फायनलमध्ये पोहोचली. उद्याच्या सामन्यात दोन गोलंदाजांना इंग्लंड टीम संधी देण्याची शक्यता आहे. कारण उद्या पाकिस्तानविरुद्ध टीमने मास्तर प्लॅन तयार केला आहे. इंग्लंड टीमचे दोन खेळाडू जखमी झाले होते. त्यांना उद्याच्या मॅचमध्ये संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
मार्क वुड आणि डेविड मलान या दोन खेळाडूंना टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
इंग्लंड संभाव्य प्लेइंग इलेव्हन : अॅलेक्स हेल्स, जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कॅरेन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड
पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, मोहम्मद वसीम आणि नसीम शाह
