AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

world cup 2023 | मोहम्मद शमी विषयी माहिती आहेत का या गोष्टी, कोच बदरुद्दीन यांनी उघडं केली गुपीतं

world cup 2023 | मोहम्मद शमी याला त्याचे वडील 2002 मध्ये उत्तर प्रदेशातील सोनकपूर स्टेडियम येथे घेऊन आले. शमीच्या गोलदांजीने धमका केल्याचे त्याच्या वडिलांनी कोच बदरुद्दीन यांना सांगितले. त्यांनी शमीची अर्धा तास परीक्षा घेतली. तेव्हा त्यांना त्याच्यावर विश्वास बसला. कोच बदरुद्दीन यांनी शमी बाबत न ऐकलेले किस्से समोर आणले.

world cup 2023 | मोहम्मद शमी विषयी माहिती आहेत का या गोष्टी, कोच बदरुद्दीन यांनी उघडं केली गुपीतं
| Updated on: Nov 17, 2023 | 1:29 PM
Share

नवी दिल्ली | 17 नोव्हेंबर 2023 : मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये मोहम्मद शमी याची कमाल उभ्या देशाने पाहिली. हा सामना भारतीय कधीच विसरणार नाहीत. क्रिकेट जगतात त्याच्या गोलंदाजीची चर्चा होणारच. त्याच्या गोलंदाजीमुळे या सामन्यावर भारताची पकड कशी मजबूत होत गेली, हे चाहत्यांनी याची देहि याची डोळा पाहिले आहे. त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात सरस कामगिरी बजावली. भारत हा यंदाच्या विश्वचषकाचा मजबूत दावेदार मानल्या जातो, तो अशा गुणी खेळाडूमुळेच. त्याच्या कामगिरीच्या प्रेमात तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पण पडले आहेत. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास वाटतो तितका सोपा नक्कीच नव्हता.

खेड्यातून आजमावले नशीब

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका खेड्यातून मोहम्मद शमीने इथपर्यंतचा प्रवास गाठला आहे. या विश्वचषकात त्याने आतापर्यंत 23 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्या या जडणघडणीत त्याचे कोच बदरुद्दीन यांची भूमिका सर्वात महत्वाची ठरली. मोहम्मद शमी 13,14 वर्षांचा असताना त्याने 25 किलोमीटर दूर असलेल्या मुरादाबादच्या सोनकपूर स्टेडियममध्ये गुरुमंत्र घेतला. त्याचे कोच बदरुद्दीन यांनी त्याला घडविण्यात मोलाची भूमिका निभावली.

अशी झाली पारख

मोहम्मद शमीचे वडील त्याला सोनकपूर स्टेडियममध्ये घेऊन आले होते. 2002 मधील हा किस्सा आहे. त्यावेळी कोच बदरुद्दीन यांना त्यांनी मुलाचे कौतुक सांगितले. बदरुद्दीन यांनी शमी याला वार्मअम करायला लावला. त्यानंतर त्याला 30 मिनिटे गोलंदाजी करायला लावली. पहिल्या मिनिटाला टाकलेला चेंडू आणि 30 मिनिटाला टाकलेला चेंडू यामध्ये कोणतेच अंतर नसल्याचे कोचच्या लक्षात आले.

गोलंदाजी करताना थांबवावे लागायचे

जून महिन्यात अत्यंत उकाडा असताना पण शमी जोरदार गोलंदाजी करत असे. न थकता त्याची मेहनत सुरु असायची. तो आजारी पडू नये, यासाठी गोलंदाजी करताना त्याला थांबवावे लागायचे, अशी आठवण बदरुद्दीन यांनी सांगितली. त्याच्या अनेक आठवणी कोचने जागवल्या.

खासगी आयुष्यातील वादळावर केली मात

शमीने त्याच्या मनगटाचा चांगला उपयोग केल्याचे त्याचे कोच आवर्जून उल्लेख करतात. ज्याला या मनगटाचे कौशल्य कळाले, त्याला विकेट घेणे सर्वात सोपे असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही जितक्या खुबीने मनगटाचा वापर कराल, तितके चांगले गोलंदाज व्हाल असा मंत्र त्यांनी दिला. शमीने आता त्याच्या खासगी आयुष्यातील वादळावर मात केल्याचे ही बदरुद्दीन यांनी सांगितले.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.